गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू असलेला इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) माध्यम हक्कांचा लिलाव आज संपला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी ट्विट करून याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली. २०२३ ते २०२७ या काळात आयपीएलचे टीव्ही प्रसारण हक्क स्टारकडे आणि डिजिटल राइट्स वायाकॉमकडे (रिलायन्स) असणार आहेत. पाच वर्षांसाठीच्या एकूण चार पॅकेजेसला ४८ हजार ३९० कोटी मिळाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ट्विट करून वायाकॉमचे अभिनंदन केले असून लिलावात बोली लावणाऱ्यांचेही आभार मानले आहेत. जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “वायकॉम-१८ ने २३ हजार ७७५ कोटी रुपयांना डिजिटल हक्क विकत घेतले आहेत. भारताने डिजिटल क्रांती पाहिली आहे आणि या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. डिजिटलने आपला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, म्हणूनच खेळाच्या वाढीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे.”

वायाकॉम-१८ ने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंग्डममधील प्रसारणाचेही हक्क विकत घेतल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे. टाइम्स इंटरनेटने मध्य पूर्व आणि अमेरिकेतील सर्व हक्क विकत घेतले आहेत. टाईम्सकडे इतर देशांचेही हक्क असतील, अशी माहिती बीसीसीआय सचिवांनी दिली आहे.

जय शाह यांनी आणखी एक ट्विट केले की, “या लिलावात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो. विजेत्यांना बीसीसीआय सर्वतोपरी मदत आणि समर्थन देईल. या लिलावातून बीसीसीआयला जे काही उत्पन्न मिळेल ते देशांतर्गत क्रिकेटची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी वापरले जाईल, जेणेकरून चाहत्यांना क्रिकेट पाहण्याचा आनंद घेता येईल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl media rights sold for 48390 crore rupees bcci secretary jay shah announces vkk
First published on: 14-06-2022 at 19:25 IST