आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) आता दोन नवीन संघ खेळताना दिसणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ जोडले गेले आहेत. लीगच्या १५व्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये मेगा ऑक्शन सुरू आहे. या ऑक्शनमध्ये पहिल्या दिवशी दुपारपर्यंत चार खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. यात भारताच्या दिग्गज खेळाडूचा समावेश आहे.

मिस्टर आयपीएल सुरेश रैना अनसोल्ड राहिला आहे. ३५ वर्षीय रैना मागील मोसमात फ्लॉप ठरला होता, त्यामुळे कोणत्याही फ्रेंचायजीने त्याच्या नावावर लिलावात रस दाखवला नाही. या लीगमधील यशस्वी फलंदाज असल्यामुळे रैनाला मिस्टर आयपीएल म्हटले जाते. त्याचा मित्र आणि भारताचा माजी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगनेही त्याच्यावर कोणत्याही फ्रेंचायझीने बोली न लावल्याने निराशा व्यक्त केली

हेही वाचा – IPL Auction 2022: लिलाव सुरु असताना अचानक ऑक्शनर कोसळला अन्…; धक्कादायक Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, टी-२० लीगमधील स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरवरही कोणत्याही फ्रेंचायझीने रस दाखवलेला नाही. तसेच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन अनसोल्ड राहिला आहे.