MS Dhoni Aarti on TV: सोमवारी आयपीएल २०२३चा सहावा सामना पार पडला. या सामन्यासाठी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सीएसके आणि एलएसजी आमनेसामने आले होते. या सामन्यात चेन्नईने लखनऊ संघावर १२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्तत्पुर्वी या सामन्याच्याआधीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनीचा चाहता त्याची टीव्हीवर आरती करताना दिसत आहे.

चेपॉक स्टेडियम हे सीएसके संघाचे होम ग्राउंड आहे, त्यामुळे हजारो चाहते हा सामना पाहण्यासाठी आले होते. नाणेफेकसाठी धोनी मैदानात पोहोचला तेव्हा प्रेक्षकांनी जल्लोष केला. धोनीला पाहून चाहत्यांनी धोनी-धोनीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.जेव्हा धोनी टॉसला उपस्थित होता, तेव्हा त्याचा एक चाहता टीव्हीवर त्याची आरती करताना दिसला. हा व्हिडिओ पाहून असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही की, बहुतेक चाहते त्यांचा आवडता क्रिकेटर धोनीला देव मानतात. चाहत्याने आरती करून धोनीबद्दलची क्रेझ व्यक्त केली आहे.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Delhi beat Gujarat by 4 runs Shubman Gill reacts to defeat
DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा

हेही वाचा – IPL 2023: केकेआर संघाला मोठा धक्का! आयपीएलच्या १६व्या हंगामातून ‘या’ अष्टपैलू खेळाडूने घेतली माघार

चाहत्याने धोनीची आरती केली –

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, धोनी टीव्ही स्क्रीनवर दिसतो तेव्हाच चाहता त्याची आरती करत आहेत. मग टीव्हीच्या पडद्यावरच तो धोनीला टिळा लावतोय. दुसरीकडे, धोनी आपल्या टीमसोबत मैदानात उतरला तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी एकच जल्लोष केला होता.
सामन्याबद्दल बोलायचे, तर आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई संघाने पहिला विजय मिळवला आहे. चार वर्षांनंतर चेन्नईने त्यांच्या होम ग्राउंड चेपॉकवर खेळताना लखनौ सुपरजायंट्सचा १२ धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने ७ गडी गमावून २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ ७ गडी गमावून २०५ धावाच करू शकला. त्यामुळे त्यांनी १२ धावांनी सामना गमावला.

एमएस धोनीच्या ५००० धावांचा टप्पा पूर्ण –

धोनीने आयपीएलमध्ये २३६ सामन्यांमध्ये ३९.०९ च्या सरासरीने आणि १३५.५४ च्या स्ट्राइक रेटने ५००४ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात ५००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा धोनी हा सातवा फलंदाज आहे. त्याच्याआधी विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि एबी डिव्हिलियर्स यांनी ही कामगिरी केली आहे. कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने २२४ सामन्यात ६७०६ धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ शिखर धवनचा क्रमांक लागतो, ज्याने २०७ सामन्यात ६२८३ धावा केल्या आहेत.