आयपीएलच्या यंदाच्या हंगामात बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. मात्र या हंगामात बंगळुरुच्या चाहत्यांना या संघाकडून खेळणाऱ्या एबी डिव्हिलियर्स या खेळाडूची कमतरता जाणवली. त्याने बंगळुरु संघाला अनेकवेळा एकट्याने विजय मिळवून दिला आहे. मात्र आता डिव्हिलियर्स पुन्हा एकदा बंगळुरुच्या ताफ्यात सामील होणार आहे. पुढच्या म्हणजेच २०२३ च्या आयपीएल हंगामामध्ये तो बंगळुरु संघाच्या ताफ्यात दिसू शकतो. तसे संकेत डिव्हिलियर्सने दिले आहेत.

हेही वाचा >>> IPL 2022 GT vs RR : आज गुजरात-राजस्थान आमनेसामने, अंतिम सामन्यात कोण पोहोचणार? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

मूळचा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स २०११ सालापासून बंगळुरु संघाचा भाग राहिलेला आहे. त्याने विराट कोहलीच्या साथीने अनेकवेळा बंगळुरुला विजय मिळवून दिलाय. २०१८ साली त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतरदेखील तो पुढचे तीन वर्षे बंगळुरुकडून खेळत राहिला. या हंगामात तो आयपीएल क्रिकेटमध्ये सहभागी झाला नाही. मात्र आता पुन्हा एकदा तो बंगळुरुच्या ताफ्यात दाखल होणार आहे. यावेळी तो खेळाडू म्हणून संघात परतेल की त्याच्याकडे दुसरी जबाबदारी असेल याबाबत अजूनतरी अनिश्चितता आहे.

हेही वाचा >>> लियाम लिव्हिंगस्टोनने केली कमाल, एका हाताने टीपला अभिषेक शर्माचा अफलातून झेल

याआधी विराट कोहलीनेदेखील डिव्हिलियर्सच्या परतण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर विराटने संकेत दिले त्याबद्दल मला आनंद होत आहे. मात्र अजूनतरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. माझ्याकडे कोणती जबाबदारी असेल याबाबत मला माहिती नाही. मात्र मला बंगळुरु संघाची आठवण येत असून लवकरच परतायला आवडेल, असे डिव्हिलियर्स म्हणाला.