Andre Russell Bollywood Song: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक खेळाडू आंद्रे रसेल क्रिकेटच्या मैदानावर तर प्रसिध्द तर आहेच. पण आता तो बॉलीवूडच्या मैदानातही आपल्याला दिसणार आहे. आयपीएलमुळे रसेल सध्या भारतात आहे आणि याचदरम्यान तो त्याने मुंबईत एक गाणे शुट केले आहे. या गाण्यात त्याच्यासोबत प्रसिध्द अभिनेत्री अविका गोर आहे. यांचं ‘ल़डकी तू कमाल की’ गाणे ९ मे ला रिलीज होणार आहे.

आंद्रे रसेल पलाश मुच्छलच्या गाण्यातून करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

रसेल हा पलाश मुच्छलच्या म्युझिक व्हीडिओमध्ये दिसणार आहे. पलाश मुच्छल हा सुप्रसिध्द गायक आमि दिग्दर्शक आहे. पलाशने त्याच्या इन्स्टाग्रामवर या गाण्याचा पोस्टर रिलीज केला आहे. ज्यात आंद्रे रसेल आणि अविका गोर आहेत. तर त्याआधी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये फक्त आंद्रे रसेल हातात क्लॅप घेऊन बसल्याचा फोटो आहे. ज्याच्यावर ‘ल़डकी तू कमाल की’या गाण्याचे नाव लिहिले आहे, पलाश हा म्युझिक व्हीडिओ सोबत चित्रपटांचे दिग्दर्शनही करतो. ‘काम चालू है’ हा त्याचा चित्रपट सध्या रिलीज झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंद्रे रसेल यंदाच्या हंगामात तुफान फॉर्मात आहे. रसेल अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलत आहे. आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यांपैकी १८६ च्या स्ट्राईक रेटने त्याने १७९ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये रसेल जसा त्याच्या कामगिरीने हिट ठरला आहे, त्याचप्रमाणे त्याच्या या म्युझिक व्हीडिओला चाहते किती प्रेम देणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.