Sara Tendulkar Reaction Viral On Social Media : गुजरात टायटन्सविरोधात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, सामन्यात अर्जुन तेंडुलकरने अप्रतिम गोलंदाजी केली अन् ऋद्धीमान साहाला बाद केलं. अर्जुनच्या गोलंदाजीवर ईशान किशनने साहाचा झेल पकडला आणि गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला. अर्जुनने २ षटकांची गोलंदाजी केली आणि ९ धावा देत एक विकेट घेतली. या सामन्यात अर्जुनला पहिल्यांदाज फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि ९ चेंडूत त्याने १३ धावा केल्या. अर्जुनने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर गगनचुंबी षटकारही ठोकला. त्यानंतर सारा तेंडुलकरने जबरदस्त रिअॅक्श दिली आणि इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये आगीचा इमोजी असल्याचं दिसत आहे.

अर्जुनने आयपीएलमध्ये चार सामने खेळून ३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. अर्जुनची मागील सामन्यात खूप धुलाई झाली होती. पण त्यानंतर मंगळवारी झालेल्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने वापसी करत अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. अर्जुनने दोन षटकात ९ धावा देत अप्रतिम गोलंदाजी केली.

नक्की वाचा – स्ट्राईकपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला…पण वढेरालाही अर्जुनने दाखवली ‘तेंडुलकर’ पॉवर, पाहा गगनचुंबी षटकाराचा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम स्टोरी

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा कोच शेन बॉण्डने म्हटलं की, अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीची गती वाढवण्याकडे लक्ष देण्यात येईल. सध्या अर्जून १३० प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे. मागील सामन्यात जे काही झालं, त्यानंतर त्याने चांगली गोलंदाजी केली. एवढ्या प्रेक्षकांसमोर खेळणं सोपं नसतं. आम्ही त्याच्या गोलंदाजीचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही त्याला या सामन्याआधी जे सांगितलं होतं, त्याने तशाच प्रकारे कामगिरी करून दाखवली.