Chennai Super Kings vs Gujarat Titans Qualifier 1 Match Today: आयपीएल २०२३ चा पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. गेल्या मोसमातील निराशाजनक कामगिरीनंतर चेन्नईने यंदा दणक्यात पुनरागमन केले आणि गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. संघ आता अंतिम फेरीपासून केवळ एक विजय दूर आहे. चेन्नई सुपर किंग्जचा हा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर हा क्वालिफायर सामना खेळणार आहे.

घरच्या मैदानावर सीएसकेची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही –

चेन्नई सुपर किंग्ज बरेच दिवस त्यांचे घरचे सामने चेपॉक स्टेडियमवर खेळत आहेत. मात्र हा संघ कोरोनामुळे तीन वर्षे घरापासून दूर राहिला. यंदा त्यांना पुन्हा एकदा ही संधी मिळाली पण तीन वर्षांत परिस्थिती खूप बदलली आहे. येथील संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे विशेष झालेली नाही.

सीएसकेने घरच्या मैदानावर शेवटचा सामना गमावला होता –

चेन्नईने या मोसमात घरच्या मैदानावर एकूण सात सामने खेळले आहेत. सातपैकी संघाने चार सामने जिंकले असले, तरी त्यांचा खेळ फारसा नेत्रदीपक झाला नाही. या मैदानावरील शेवटच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अनुभवी गोलंदाज हरभजन सिंगही असेच मानतो. तो म्हणाला, ‘चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होईल. या दोन्ही संघांना मोठे सामने कसे जिंकायचे हे माहित आहे.

हेही वाचा – CSK vs GT Qualifier 1: पहिल्या क्वालिफायर सामन्यात ‘या’ पाच खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सर्वांच्या नजरा, जाणून घ्या कोण आहेत?

गुजरातला पूर्ण संधी मिळेल –

तो पुढे म्हणाला, ‘चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होईल. त्याला त्यांची खेळपट्टी माहीत आहे. मात्र, यावेळी घरच्या खेळपट्टीवर त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. त्यामुळे हा सामना रोमांचक होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफ खेळताना पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने खेळतात. या सामन्यासाठी मी उत्सुक आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशिक्षक फ्लेमिंग यांचा खेळपट्टीवर विश्वास नाही –

चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही सांगितले की, चेन्नईच्या खेळपट्टीबाबत त्यांना फारशी खात्री नाही. तो म्हणाला, ‘चेन्नईच्या खेळपट्टीबाबत आम्ही अजून निश्चितपणे काही सांगू शकत नाही. काळानुरूप ही खेळपट्टी बदलली आहे, असे आम्हाला वाटते.’