हैदराबादच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत बंगळुरूचा डाव ७ बाद १२० धावांवर रोखला. संदीप शर्मा, जेसन होल्डर यांचा भेदक मारा आणि त्याला फिरकीपटूंची मिळालेली साथ याच्या बळावर हैदराबादने विराटसेनेला फटकेबाजीची संधीच दिली नाही. १२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा मैदानात उतरले. विराटने दुसरं षटकं फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला दिलं. वॉर्नरने संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला पण पुढच्या चेंडूवर तोच फटका मारताना वॉर्नर झेलबाद झाला.

पाहा नक्की घडलं तरी काय…

आधीचा चेंडू-

नंतरचा चेंडू-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याआधी पहिल्या डावात बंगळुरूच्या फलंदाजांनी निराशा केली. सलामीवीर देवदत्त पडीकल ५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ कर्णधार विराट कोहली ७ धावांवर बाद झाला. डीव्हिलियर्स आणि जोशुआ फिलीप या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात दोघेही झेलबाद झाले. डीव्हिलियर्सने २४ तर फिलीपने ३२ धावा केल्या. नंतर वॉशिंग्टन सुंदरने चांगली फटकेबाजी करत २१ धावा केल्या, पण इतर फलंदाजांनी मात्र खेळपट्टीवर केवळ हजेरी लावली आणि तंबूत परतले. गुरकीरत सिंग झुंज देत १५ धावांवर नाबाद राहिला. संदीप शर्मा, जेसन होल्डरने २-२ तर राशिद खान, शाहबाज नदीम, नटराजन यांनी १-१ बळी टिपला.