आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जची या हंगामात पुरती दुर्दशा झाली आहे. चेन्नई सुपर किंग्जने या हंगामात आतापर्यंत सर्व चार सामने गमावले आहेत. सध्या चेन्नई संघ गुणतालिकेत सर्वात खाली आहे. त्यामुळे आगामी सामना जिंकण्याचा निर्धार केलेल्या चेन्नईला आता मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा दिग्गज वेगवान गोलंदाज दीपक चहर आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पाठीचं दुखणं उद्धभवल्यामुळे तो या आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> “…तर मी राजीनामा देईन”, हार्दिक पंड्याच्या अर्धशतकानंतर सोशल मीडियावर रंगली पोस्टर बॉयची चर्चा

दीपक चहर मागील अनेक दिवसांपासून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. मात्र यावेळी त्यााला पुन्हा एकदा पाठीचा त्रास होत आहे. याआधी दीपक क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत असून तो एप्रिलच्या शेवटी चेन्नई संघामध्ये सामील होऊ शकते असे, सांगितले जात होते. मात्र आता त्याला पाठीदुखीचा त्रास होत असल्यामुळे तो यंदाचा आयपीएल हंगाम खेळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जातेय.

हेही वाचा >>> देव तारी त्याला कोण मारी ! गुजरातच्या अभिनवला तीन वेळा जीवदान, संधीचा फायदा घेत केली धमाकेदार फलंदाजी

चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहरला १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. मात्र आता तो संघात सामील होण्याची शक्यता कमी असल्यामुळे चेन्नईसाठी हा मोठा फटका असल्याचे म्हटले जात आहे. चेन्नईने याआधी सर्वच चार सामने गमावले आहेत. त्यामुळे दीपक चहरसारखा वेगवान गोलंदाज गमावल्यानंतर चेन्नईच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. दीपकच्या जागेवर त्याच क्षमतेचा दुसरा कोणता गोलंदाज चेन्नई घेणार असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> सामन्याची नव्हे तर ‘या’ सुंदरीची होती चर्चा, दिल्ली आणि कोलकाता मॅचमधील मिस्ट्री गर्लचं नाव आलं समोर

दरम्यान चेन्नई आज आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी दोन हात करेल. रविंद्र जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ आजतरी विजय मिळवणार का हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.