scorecardresearch

अंबाती रायडू खरंच निवृत्त होणार? चेन्नईच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

आज अंबाती रायडूने ट्विट करत यंदाचे आयपीएलचे पर्व माझे शेवटचे असल्याचे म्हटले होते.

AMBATI RAYUDU
अंबाती रायडू ( Photo Credit-indianexpress.com)

चेन्नईचा दिग्गज खेळाडू अंबाती रायडूने आयपीएलच्या या हंगामानंतर निवृत्त होणार असल्याचे म्हणत लगेच माघार घेतली. रायडूच्या या कृतीनंतर चर्चेला तोंड फुटले आहे. तो क्रिकेटला खरंच रामराम ठोकणार का? असे विचारले जात आहे. त्यानंतर आता चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकार काशी विश्वनाथ यांनी प्रतिक्रिया दिलीय. रायडूने अद्याप निवृत्ती घेतली नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा >> आयपीएल मॅच फिक्सिंग-सट्टेबाजी प्रकरणी CBIची मोठी कारवाई, तिघांना घेतलं ताब्यात

इंडिया टुडेने विश्वनाथ यांच्या प्रतिक्रियेबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. “रायडू निवृत्त होणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. तो निवृत्त होणार नसून आम्हाला कसलीही चिंता नाहीये,” असे विश्वनाथ यांनी म्हटलंय. तसेच आयपीएल २०२३ मध्ये तो चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व करणार का? असे विचारताच त्यांनी “होय… होय…. तो सध्या निवृत्त होणार नाही,” असंही विश्वनाथन यांनी सांगितले.

हेही वाचा >> नाद करा पण आमचा कुठं! विराट कोहलीने रचला नवा विक्रम, IPLमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू

याआदी आज अंबाती रायडूने ट्विट करत यंदाचे आयपीएलचे पर्व माझे शेवटचे असल्याचे म्हटले होते. मात्र नंतर लगेच त्याने हे ट्विट डिलीट केले. “मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, आयपीएचे हे पर्व माझे शेवटचे असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांसाठी जपळपास १३ वर्षासाठी खेळलो. हा १३ वर्षांचा काळ माझ्यासाठी खूप चांगला होता. माझ्या या प्रवासाबद्दल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही फ्रेंचायझींचे आभार,” असे रायडूने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

हेही वाचा >> काय पण नशीब! विराट कोहली कसा बाद झाला बघाल, तर तुम्ही पण हेच म्हणाल

दरम्यान, अंबाती रायडूने आयपीएलमध्ये अनेकवेळा मोठी खेळी केलेली आहे. त्याने आयपीएलमध्ये २०१० साली पदार्पण केले होते. त्याच्या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांचे प्रतिनिधित्व केलेले आहे. २०१० ते २०१७ पर्यंत तो मुंबई संघाकडून खेळला. तर २०१८ साली मेगा ऑक्सनमध्ये त्याला चेन्नईने ६.७५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १८७ सामने खेळले असून ४१८७ धावा केल्या आहेत.

हेही वाचा >> क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूचा विराटला मोलाचा सल्ला; म्हणाला “तू काय केलं होतं हे विसर, तुझं वय…”

रायडूने २०१९ साली अशाच प्रकारे निवृत्ती जाहीर केली होती. मात्र पुन्हा यू टर्न घेत तो क्रिकेट खेळताना दिसला. त्याने आतापर्यंत ५५ एकदिवसीय सामने खेळले असून १६९४ धावा केलेल्या आहेत. तर भारतीय संघासाठी त्याने आतापर्यंत सहा टी-२० सामने खेळले आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Csk ceo kashi vishanathan comment on ambati raidu retirement said he will play for csk ahead prd