Dehi Capitals David Warner News Update : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वार्नरवर सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटिंगमुळं १२ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीने या सामन्यात सनरायझर्सचा ७ धावांनी पराभव केला. आयपीएलने प्रतिक्रिया देत म्हटलं, स्लो ओव्हर रेटिंगमुळं आयपीएल आचारसंहितेनुसार १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सामना तीन तास आणि २० मिनिटांत संपवण्याचा आयपीएलचा उद्देश आहे. परंतु, स्लो ओव्हर्समुळं काही सामने चार तासांहून अधिक तास खेळवले जात आहेत. दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीगच्या ३४ व्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादचा पराभव केला.

दिल्लीने ९ विकेट्स गमावत २० षटकांत १४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात सनरायझर्सने ६ विकेट्स गमावत १३७ धावा केल्यामुळं त्यांचा पराभव झाला. मयंक अग्रवालने सर्वात जास्त ४९ धावा केल्या. दिल्लीसाठी एनरिक नॉर्खियाने आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दिल्लीने या हंगामात सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घातली. सलग दोन विजय मिळवल्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये कॅपिटल्सचा संघ शेवटच्या टप्प्यात आहे. तर चेन्नई सुपर किंग्जने अव्वल स्थान गाठलं आहे.

नक्की वाचा – वाॅशिंग्टनच्या ‘सुंदर’ गोलंदाजीपुढे दिल्लीचा गड ढासळला; एकाच षटकात घेतल्या तीन विकेट्स, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सनरायझर्स हैद्राबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून दिल्ली कॅपिल्सच्या फलंदाजांना माघारी पाठवलं. नॉर्खियाने हॅरी ब्रुकला ७ धावांवर असताना क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर मयंक अग्रवालने सावध खेळी करत सनरायझर्सचा डाव सावरला. मयंकने ३९ चेंडूत ४९ धावांची खेळी साकारली. मात्र, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मयंक झेलबाद झाला आणि सनरायझर्सला मोठा धक्का बसला. त्यानंतर इशांत शर्माने राहुल त्रिपाठीला १५ धावांवर झेलबाद केलं. कुलदीप यादवच्या फिरकीवर अभिषेक शर्मा ५ धावांवर बाद झाला. तर कर्णधार एडन मार्करम अवघ्या तीन धावांवर असताना अक्षर पटेलने त्रिफळा उडवला.