Deepak Chahar Tells Dhoni Story in Death Overs:आयपीएल २०२३चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघांत खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी एका कार्यक्रमात दीपक चहरने सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्याने धोनी त्याच्यावर का भडकला होता, याबाबत सांगितले आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर
पण या आयपीएल सीझनमध्ये अशीही एक घटना घडली, ज्याची खूप चर्चा झाली. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान दीपकने गोलंदाजी करताना फलंदाजाला दोन बीमर फेकले होते. यानंतर धोनी संतापला आणि त्याला फटकारले. आता एका कार्यक्रमात बोलत असताना दीपकने त्या घटनेचा उल्लेख केला. तो म्हणाला, माझी गोलंदाजी पाहिल्यानंतर माही त्याला काय म्हणाला होता, ते सांगितले.
‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या शोमध्ये दीपक याविषयी बोलत होता आणि म्हणाला, “माही भाई माझ्याकडून डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करुन घेत नव्हते. पण त्या सामन्यात ब्राव्होला दुखापत झाली होती. अशा स्थितीत त्याने मला डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यास सांगितले. त्यावेळी सर्फराज क्रिजवर फलंदाजी करत होता. धोनी भाई (धोनी) मला कधीही डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करू देत नव्हते. पण त्या दिवशी मला गोलंदाजी करावी लागली. त्याने मला नेटमध्ये गोलंदाजी करताना पाहिले होते, तो माझ्यावर खूश होता. जेव्हा मला गोलंदाजी करण्यास सांगितले, तेव्हा मी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासही उत्सुक होतो.”
दीपक पुढे म्हणाला की, “तो सामना खूप चुरशीचा झाला होता. शेवटच्या ३ षटकात ४० ते ४२ धावांची आवश्यकता होती. मी सरफराजला संथ चेंडू टाकला, पण गोलंदाजी करताना माझा पाय मुरगळला, त्यामुळे चेंडू फुल टॉस गेला. त्याच्या पुढच्या चेंडूवरही माझ्या बाबतीत असेच घडले. यावेळीही चेंडू उंच फुल टॉसच गेला होता. मी बीमरसारखे सलग दोन चेंडू टाकले. त्यामुळे मला वाटू लागलं की माझं डेथ ओव्हर्समधील करिअर संपल.”
दीपक म्हणाला, “त्याचवेळी माहीभाई माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, ‘तसा तर तू दीड शहाणा बनत असतो, मला सर्व माहित आहे, हे कसे चेंडू टाकत आहेस.’ जेव्हा माही भाई मला या गोष्टी सांगत होता, तेव्हा मी खाली बघत होतो आणि विचार करत होतो की आता माझे डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणे बंद होईल. पण त्या षटकात मी फक्त ५ धावा दिल्या. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये माही भाईने मला मिठी मारली होती.
मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.