Chennai Super Kings vs Gujarat Titans Highlights, IPL 2023 Final Updates: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२८मे) पावसामुळे होऊ शकला नाही. आता सोमवारी राखीव दिवशी चॅम्पियनचा निर्णय होणार आहे. संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आजचा सामना न करण्याचा निर्णय घेतला.
आयपीएल इतिहासात प्रथमच आयपीएल अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. सायंकाळी सात वाजता नाणेफेक होऊन ७.३० वाजता सामना सुरू होणे गरजेचे होते. मात्र, सायंकाळी सहा वाजल्यापासून अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे सर्व खेळाडू व कर्मचारी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. नऊ वाजण्याच्या सुमारास काही मिनिटांसाठी पाऊस थांबला. मैदान कर्मचाऱ्यांनी मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला असतानाच पुन्हा पावसाला सुरुवात झाली.




हा सामना ९.३० वाजेपर्यंत सुरू झाला असता तर संपूर्ण वीस षटकांचा खेळ पाहण्यास मिळाला असता. मात्र, मैदान खेळण्यासाठी तयार न झाल्याने सामन्यातील षटके कमी करण्यात आली. हा सामना दहा वाजेपर्यंत सुरू झाल्यास प्रत्येकी १७ षटकांचा खेळ होईल असे सांगण्यात आले. तर १०.३० पर्यंत खेळ सुरू झाल्यास प्रत्येकी १५ षटकांचा खेळ होणार होता. तसेच ११ वाजण्याच्या पुढे खेळ सुरू झाल्यास १२ षटकांचा खेळ होणार होता. मात्र, तसे काहीही झाले नाही. या व्यतिरिक्त १२ वाजण्याच्या पुढे खेळ सुरू न झाल्यास सोमवारी हा अंतिम सामना खेळण्यात येईल. सोमवारी देखील खेळ न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येईल.
अंपायरने दिले मोठे अपडेट
समालोचक सायमन डूल यांच्याशी झालेल्या चर्चेत अंपायर नितीन मेनन आणि रॉड टकर म्हणाले, “रात्री नऊच्या सुमारास परिस्थिती चांगली होती. तीन तासांच्या पावसानंतरही आम्ही खूप आशावादी होतो पण दुर्दैवाने पाऊस पुन्हा आला. आम्ही रात्री उशिरा १२.०६ पर्यंत सामना सुरू करू शकतो. मैदान आणि खेळपट्टी कोरडी करण्यासाठी ग्राउंड्समनला किमान एक तास लागतो. रात्री ११ वाजेपर्यंत पाऊस थांबला नाही त्यामुळे उद्या (सोमवारी) पुन्हा येऊ.”
Chennai Super Kings vs Gujarat Titans IPL Final Highlights Score Updates: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आयपीएल २०२३ फायनल हायलाइट्स मॅच अपडेट्स
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलच्या १६व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२८मे) पावसामुळे होऊ शकला नाही. आता सोमवारी राखीव दिवशी चॅम्पियनचा निर्णय होणार आहे. संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आजचा सामना न करण्याचा निर्णय घेतला.
समालोचक सायमन डूल यांच्याशी झालेल्या चर्चेत अंपायर नितीन मेनन आणि रॉड टकर म्हणाले, “रात्री नऊच्या सुमारास परिस्थिती चांगली होती. तीन तासांच्या पावसानंतरही आम्ही खूप आशावादी होतो पण दुर्दैवाने पाऊस पुन्हा आला. आम्ही रात्री उशिरा १२.०६ पर्यंत सामना सुरू करू शकतो. मैदान आणि खेळपट्टी कोरडी करण्यासाठी ग्राउंड्समनला किमान एक तास लागतो. रात्री ११ वाजेपर्यंत पाऊस थांबला नाही तर उद्या (सोमवारी) पुन्हा येऊ.”
अहमदाबादमधील क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. पाऊस काही थांबयचे काही नाव घेत नसून आज सामना सुरु होईल असे वाटत नाही. पावसाचे सामने अजून सुरू झालेले नाहीत. अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आता ओव्हर कटिंग सुरू झाली आहे. जर सामना रात्री १० वाजता सुरू झाला तर १९-१९ षटकांचे सामने होतील. तेथे १०.१५ वाजता सुरू झाल्यास १७ षटकांचा आणि १०.३० वाजता सुरू झाल्यास १५ षटकांचा सामना शक्य होईल.

अहमदाबादमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. काही काळ हवामान स्वच्छ झाल्यानंतर, कव्हर्स जमिनीवरून काढून टाकण्यात आले. त्याचबरोबर मैदान आणि खेळपट्टी कोरडे करण्याचे काम सुरू झाले होते. आता पावसाने पुन्हा विस्कळीतपणा निर्माण केला आहे. दोन्ही संघांचे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
ग्राउंड कोरडे करणारे कर्मचारी स्टँडवर परतले आहेत. या वेळी पूर्वीपेक्षा जास्त पाऊस पडत आहे. आयपीएल फायनलमध्ये पावसामुळे सामना वेळेवर सुरू न होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी पावसाने आतापर्यंत कोणत्याही फायनलमध्ये व्यत्यय आणला नाही.

अहमदाबादमध्ये पाऊस थांबला आहे. खेळपट्टी कोरडे करण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू मैदानात उतरले आहेत. मैदान सुकायला बराच वेळ लागेल. काही षटके कमी केले जातील असे दिसते.
अहमदाबादमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. जर सामना ९.४० वाजता सुरू झाला, तर पूर्ण षटके टाकली जातील. दोन्ही संघ २०-२० षटके खेळतील. तसे न झाल्यास ओव्हर कटिंग सुरू होईल. दुपारी १२.०६पर्यंत पाच षटकांचा सामना झाला नाही तर सामना राखीव दिवशी पूर्ण होईल. आज सामना न झाल्यास सोमवारी (२९ मे) पुन्हा सामना खेळवला जाईल. सोमवारीही पावसामुळे सामना झाला नाही, तर साखळी फेरीअखेर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणारा गुजरात टायटन्सचा संघ हा सामना जिंकेल. चेन्नई सुपर किंग्जसाठी ही वाईट बातमी असेल.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1662825140797964291?t=LP2OHGtqA9o4mkmnXICSTQ&s=08
अहमदाबादमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. जर सामना ९.३५ वाजता सुरू झाला, तर पूर्ण षटके टाकली जातील. दोन्ही संघ २०-२० षटके खेळतील. तसे न झाल्यास ओव्हर कटिंग सुरू होईल. दुपारी १ पर्यंत पाच षटकांचा सामना झाला नाही तर सामना राखीव दिवशी पूर्ण होईल. आज सामना न झाल्यास सोमवारी (२९ मे) पुन्हा सामना खेळवला जाईल.

आयपीएल फायनलमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. टॉस अजून झालेला नाही. या मैदानावर गुजरात आणि मुंबई इंडियन्स यांच्यात क्वालिफायर-२खेळला गेला तेव्हाही पावसामुळे सामना लांबला. टॉसला ४५ मिनिटे उशीर झाला.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1662825689433931776?t=dVIhV8QrBudY9_ne8yhFOA&s=08
रंगारंग समारोप सोहळ्यादरम्यान पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सोहळा अर्ध्यावरच थांबवावा लागला. त्यात कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली.
आयपीएल २०२३च्या फायनल सामन्यात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे नाणेफेक उशिराने होणार असून सामना देखील उशिरा सुरु होणार आहे.
महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या १६व्या हंगामाच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा चॅम्पियन बनवेल. रविवारी (२८ मे) विजेतेपदाच्या लढतीत चेन्नईचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. धोनीने हा सामना जिंकल्यास तो आपल्या संघाला पाचव्यांदा चॅम्पियन बनवेल. आयपीएलमधील ४१ वर्षीय खेळाडूचा हा शेवटचा सामना असेल, असे मानले जात आहे. त्यानंतर ते निवृत्त होणार आहेत. मात्र, धोनीनेच सीझनमध्ये अनेकदा निवृत्तीच्या वृत्ताचे खंडन केले.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1662681014592995328?s=20
चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज अंबाती रायडूने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रायुडूने रविवारी (२८ मे) गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी निवृत्ती जाहीर केली. एका ट्विटमध्ये रायडूने चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे आभार मानले आहेत. यावेळी आपण आपला निर्णय बदलणार नसल्याचेही रायडूने सांगितले.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1662804045193678848?s=20
आयपीएल २०२३चा पहिला सामना चेन्नई आणि गुजरात यांच्यात अहमदाबादमध्ये झाला. या सामन्यातही चाहते चेन्नईच्या जर्सीत आले आणि गुजरातच्या घरच्या मैदानावरही चेन्नईला भरभरून पाठिंबा मिळाला. गायक अरिजित सिंगनेही धोनीच्या पायाला स्पर्श केला. दुसऱ्या सामन्यात चेन्नईचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळला आणि मोठ्या संख्येने चाहते त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले. चेपॉकच्या मैदानावर झालेल्या प्रत्येक सामन्यात चेन्नईला साथ मिळेल याची खात्री होती, मात्र विरोधी संघांच्या घरच्या मैदानावरही चेन्नईला एकतर्फी साथ मिळाली. आजही अनेक चाहते स्टेडीयममध्ये पोहचण्यासाठी गर्दी करत आहेत.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1662793817056239618?s=20
चेन्नईचा संघ विक्रमी दहाव्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. ते आतापर्यंत चार वेळा चॅम्पियन बनली आहे. त्यांना पाच फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेवटच्या तीन अंतिम सामन्यांबद्दल बोलायचे तर चेन्नईने दोनदा (२०१८, २०२१) विजय मिळवला. त्याचवेळी, एकदा (२०१९) त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, गुजरातसाठी ही केवळ दुसरी फायनल आहे. गेल्या वेळी ती चॅम्पियन होती.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1662741783380647936?s=20
या आयपीएलची सुरुवात ३१ मार्चपासून नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली. त्यानंतर फक्त गुजरात आणि चेन्नईचे संघ आमनेसामने होते. आता याच मैदानावर आयपीएलचा शेवटचा सामना याच दोन संघांमध्ये होणार आहे. यंदाही पाकिस्तानात असेच घडले आहे. पाकिस्तान प्रीमियर लीगचा पहिला सामना मुलतान सुलतान आणि लाहोर कलंदर यांच्यात झाला. त्यानंतर लाहोर जिंकला होता. यानंतर अंतिम फेरीतही दोन्ही संघ आमनेसामने आले होते. लाहोरने पुन्हा एकदा मुलतानचा पराभव केला. मात्र, हे दोन्ही सामने आयपीएलसारख्या एकाच मैदानावर झाले नाहीत. पीएसएलचा पहिला सामना मुलतानमध्ये तर अंतिम सामना लाहोरमध्ये झाला होता.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. येथील सपाट खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे आहे. येथे फलंदाज खूप धावा करतात. शुबमन गिलनेही गेल्या सामन्यात हे सिद्ध केले आहे. खेळपट्टीवर एकसमान उसळी आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. आउटफिल्ड देखील खूप वेगवान आहे. २०२३ मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांची सरासरी १८७ धावसंख्या आहे. या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो आणि जिंकतो.
अहमदाबाद हवामान अपडेट
गेल्या काही दिवसांत देशातील बहुतांश भागात पाऊस पडला आहे आणि याचा परिणाम आयपीएल २०२३च्या सर्वात महत्त्वाच्या सामन्यावर होऊ शकतो. भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे की २८मे रोजी अहमदाबादच्या बहुतांश भागात हवामान स्वच्छ असेल. चाहत्यांचीही तशीच अपेक्षा असेल. मात्र, Accuweather च्या अहवालानुसार अहमदाबादमध्ये रविवारी संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी संध्याकाळी पावसाची ४० टक्के शक्यता आहे. अहवालानुसार, अहमदाबादमध्ये एकूण दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. सूर्यास्तानंतर पावसासह संध्याकाळी ५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे.
धोनीबद्दल बोलायचे झाले तर त्याला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही. तो क्रिकेटमधील महान कर्णधारांपैकी एक मानला जातो. धोनी कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्याचा हा शेवटचा सीझन असल्याचे मानले जात आहे. त्याला त्याच्या शेवटच्या आयपीएल मोसमात ट्रॉफीसह निघायचे आहे. धोनीने यावेळी चेन्नईला चॅम्पियन बनवले तर तो पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी उचलेल. सर्वाधिक जेतेपदांच्या बाबतीत तो रोहित शर्माची (मुंबई इंडियन्स) बरोबरी करेल.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1662779159897313280?s=20
चेन्नई आणि गुजरात यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. दोन्ही संघांमधील हा पाचवा सामना असेल. गुजरातने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. त्याचवेळी चेन्नईने एकदा विजय मिळवला आहे. गतवर्षी हार्दिक पांड्याच्या संघाने चेन्नईचा दोन सामन्यांत पराभव केला होता. यावेळी हार्दिकने उद्घाटनाच्या सामन्यात बाजी मारली. या पराभवाचा बदला धोनीने क्वालिफायर-१ मध्ये घेतला. चेन्नईने गुजरातचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
आयपीएलच्या १६व्या हंगामाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. रविवारी (२८ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. माहीच्या चेन्नईचे पाचव्यांदा चॅम्पियन होण्याकडे लक्ष आहे. त्याचवेळी गतविजेते गुजरात ट्रॉफी राखण्यासाठी मैदानात हार्दिकच्या नेतृत्त्वात मैदानात उतरतील.