आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६४ वा सामना गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी फारसा महत्त्वाचा नाही. कारण हा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र, गुणतालिकेत टॉप २ मध्ये जाण्यासाठी हा संघ गुजरात टायटन्ससाठी अतिशय महत्वाचा आहे. दरम्यान होम ग्राउंडवर सुरू असलेल्या या सामन्यातील सुरुवातीच्या षटकांमध्ये गुजरात टायटन्स संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ सुपर जायंट्सकडून डावाची सुरूवात करण्यासाठी मिचेल मार्श आणि एडन मार्करमची जोडी मैदानावर आली. या जोडीने मोहम्मद सिराजची गोलंदाजी सावधपणे खेळून काढली. त्यानंतर अर्शद खान गोलंदाजीला आला. या जोडीने अर्शद खानच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

या षटकात गोलंदाजी करत असताना अर्शद खान एकदा नाहीतर दोनदा पाय घसरून पडला. ज्यावेळी तो गोलंदाजीला आला त्यावेळी रनअप घेऊन क्रिझपर्यंत पोहोचणार इतक्यात त्याचा पाय घसरला. त्यामुळे त्याच्यावर मैदान सोडून जाण्याची वेळ आली. मात्र, त्याने आपलं षटक पूर्ण केलं आणि त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला.

अर्शद खान मैदान सोडून बाहेर गेलाच होता, इतक्यात गुजरात टायटन्सला आणखी एक धक्का बसला. सिराजने आपल्या गोलंदाजीवर मार्शचा झेल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या हाताला जोरात लागला. त्याला प्राथमिक उपचार घेण्यासाठी मैदानाबाहेर जावं लागलं. मात्र, तो प्राथमिक उपचार घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आला होता.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

लखनऊ सुपर जायंट्स (Playing XI):
मिचेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टिरक्षक/कर्णधार), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओ’रूर्के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरात टायटन्स (Playing XI):
शुभमन गिल (कर्णधार), जॉस बटलर (यष्टिरक्षक), शेर्फेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, अर्शद खान, रविस्रीनिवासन साई किशोर, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा