Gujarat Titans worried due to rain : आयपीएलचा १७वा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून गुजरात टायटन्सची चिंता वाढली आहे. अहमदाबादमध्ये सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यावर संकटाचे ढग आहेत. या सामन्यात अद्याप नाणेफेक झालेली नाही. यामध्ये सातत्याने विलंब होत आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. हा सामना झाला नाही तर गुजरातचा संघ प्ले ऑफमधून बाहेर पडेल.
पावसामुळे गुजरात टायटन्सची वाढवली चिता –
वास्तविक, गुजरात टायटन्स संघ १० गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. जर संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल, तर त्याला उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. आजचा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. यासह यासह गुजरात टायटन्सचे ११ गुण होतील. यानंतर जरी त्यांनी पुढील सामना जिंकला, तरी ते केवळ १३ गुण मिळवू शकतील. त्यामुळे ते प्लेऑफमधून बाहेर पडतील. कारण चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादचे आधीच १४ गुण झाले आहेत.
अहमदाबादमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस –
अहमदाबादमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मैदान कव्हरने झाकले गेले आहे. काही वेळापूर्वी पाऊस मंदावला होता आणि सुपरसोपर्स जमीन कोरडे करण्यात व्यस्त होते. पंच आणि ग्राउंड स्टाफमध्ये संभाषणही झाले. मात्र, आता पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. मैदानात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मात्र, पाच षटकांच्या सामन्यांची कट ऑफ वेळ रात्री १०.५६ पर्यंत आहे. अजून सामन्याची नाणेफेकही झालेली नाही.
हेही वाचा – राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! जोस बटलर IPL 2024 च्या पुढील दोन सामन्यांमध्ये खेळणार नाही
प्लेऑफ्सची लढत रोमांचक वळणावर पोहोचली –
प्लेऑफ्समध्ये स्थान मिळविणारा पहिला संघ केकेआरविरुद्ध या दोघांची कामगिरी टायटन्ससाठी खूप महत्त्वाची ठरेल. सध्या सात संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. राजस्थान रॉयल्स (१६) आणि सनरायझर्स हैदराबाद (१४) दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्सचे समान १२ गुण आहेत. टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे प्रत्येकी १० गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. गुजरात टायटन्सचा नेट रन रेट चांगला नाही आणि अशा परिस्थितीत संघाने अंतिम चारमध्ये स्थान मिळवले, तर ते चमत्कारापेक्षा कमी नसेल. मात्र, टायटन्स संघ जर-तर समीकरणात कायम राहण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, हे निश्चित.