scorecardresearch

मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास! गुजरात टायटन्सचा ६२ धावांनी दणदणीत विजय, GT ने गाठली IPL ची अंतिम फेरी

IPL 2023, MI vs GT Qualifier 2 Match Score : मोहित शर्माच्या भेदक गोलंदाजीमुळं गुजरात टायटन्सने मुंबईचा पराभव केला.

GT vs MI Qualifier 2 Updates
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर २ स्कोअर

Gujarat Titans vs Mumbai Indians Qualifier 2 Match : गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या क्वालिफायर २ सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुजरातच्या शुबमन गिलने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत आयपीएल २०२३ मध्ये तिसरं शतकं ठोकलं. शुबमन गिलने ६० चेंडूत १० षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर १२९ धावांची वादळी शतकी केली. तसंच साई सुदर्शननेही जबरदस्त फलंदाजी करत ४३ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने १३ चेंडूत २८ धावांची नाबाद खेळी केली. या धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकात २ विकेट्स गमावत २३३ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबईला विजयासाठी २० षटकात २३४ धावांचं तगडं लक्ष्य गाठावं लागणार होतं. परंतु, गुजरातच्या मोहित शर्माने आणि मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी केल्यामुळं मुंबई इंडियन्सचा संघ १७१ धावांवर गारद झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर पडली असून गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जविरोधात फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई इंडियन्ससाठी कॅमरून ग्रीन (३०), सूर्यकुमार यादव (६१) आणि तिलक वर्मा (४३) यांनी खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहित शर्मा (८), नेहल वढेरा (४), विष्णू विनोद (५) यांच्यासह इतर सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले आणि मुंबईचा पराभव झाला. गुजरातसाठी मोहम्मद शामीने २, राशिद खानने २, जोशिल लिटिलने एक तर या सामन्यातील हिरो ठरलेल्या मोहित शर्माने पाच विकेट्स घेतल्या. गुजरातचे सलामीचे फलंदाज शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहाने अप्रतिम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

पॉवर प्ले मध्ये दोन्ही फलंदाजांनी सावध खेळी केल्याने मुंबईला विकेट मिळाली नाही. परंतु, त्यानंतर सहाव्या षटकात पीयुष चावलाने ऋद्धीमान साहाला १८ धावांवर बाद केलं. शुबमन गिलने ६० चेंडूत १० षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर १२९ धावांची वादळी शतकी केली. तसंच साई सुदर्शननेही जबरदस्त फलंदाजी करत ४३ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने १३ चेंडूत २८ धावांची नाबाद खेळी केली. या धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकात २ विकेट्स गमावत २३३ धावांपर्यंत मजल मारली होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2023 at 00:08 IST

संबंधित बातम्या