Harbhajan Singh praises Jos Buttler : राजस्थान रॉयल्सचा स्फोटक फलंदाज जोस बटलरने पुन्हा एकदा अशी कामगिरी केली आहे, जे प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते. केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात बटलरने शानदार शतक झळकावले आणि शेवटच्या चेंडूवर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हातातून निसटलेला विजय केकेआरच्या जबड्यातून हिसकावून घेताना बटलरने ६० चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १०७ धावा केल्या. त्याच्या या स्फोटक खेळीची क्रिकेट वर्तुळात चर्चा होत आहे. बटलरच्या या शानदार खेळीवर अनुभवी गोलंदाज आणि समालोचक हरभजन सिंगने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

जोस बटलरलाही तोट सन्मान मिळायला हवा –

हरभजन सिंगने विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीचे उदाहरण देत बटलरलाही भारतात असाच सन्मान मिळायला हवा, असे सांगितले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “जर विराट कोहलीने हे शतक झळकावले असते, तर आम्ही ते दोन महिने त्याचे सेलिब्रेशन केले असते. जसे आपण धोनीच्या तीन षटकारांबद्दल बोलतो. त्याबरोबर आपण जसे आपल्या खेळाडू शतक झळकावल्यानंतर सेलिब्रेशन करतो, तसेच आपण हे शतकाचे सेलिब्रेशने केले पाहिजे. कारण बटलर हा दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याचाही सन्मान केला पाहिजे.”

ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
What Ajit Pawar said?
अजित पवार स्पष्टच बोलले, “काल-परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं आणि मी कपाळावरच हात मारला”

भविष्यातही आश्चर्यकारक कामगिरी करू शकतो –

हरभजन सिंगने जोस बटलरच्या रेकॉर्डब्रेक शतकी खेळीचे कौतुक करताना म्हणाला की, “तो एक खास आणि वेगळ्या दर्जाचा खेळाडू आहे. त्याने असा पराक्रम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या अतुलनीय खेळाडूला अशी कामगिरी करताना आपण पुढेही पाहत राहू शकतो. परंतु आपण त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही. कारण तो भारतीय खेळाडू नाही.”

हेही वाचा – KKR vs RR : जोस बटलरचं धोनी-कोहलीबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, “ते दोघे ज्या प्रकारे शेवटपर्यंत…”

जोस बटलरचे रेकॉर्डब्रेक शतक –

जोस बटलरने १०७ धावांची नाबाद खेळी साकारत आयपीएलमधील ७ वे शतक झळकावले, ज्यात त्याने ९ चौकार आणि ६ षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १७८.३३ होता. त्याचबरोबर या हंगामातील त्याचे हे दुसरे शतक आहे. या शतकासह बटलरने अनेक विक्रमही मोडीत काढले. बटलरने सर्वाधिक आयपीएल शतकांच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये ६ शतके झळकावली होती. विराट कोहलीनंतर बटलर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. आयपीएल २०२४ मध्ये झळकावलेल्या एका शतकासह, कोहलीने या लीगमध्ये आतापर्यंत ८ शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – IPL 2024 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतके सामने जिंकणे आवश्यक, ‘या’ संघांच्या वाढल्या अडचणी

राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत अव्वल –

राजस्थान रॉयल्स संघ आतापर्यंत आयपीएल २०२४ मधील ७ सामन्यांतील ६ विजयांच्या जोरावर १२ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचवेळी, कोलकाता नाइट रायडर्स ६ सामन्यात ४ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरचे ८ गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोघांच्या नावावर ६ सामन्यांत ४ विजय आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ ७ सामन्यांत केवळ एका विजयासह तळात आहे.