भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अमित मिश्राने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. शारजात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात सामना खेळत असताना अमित मिश्राने दिल्लीकडून आयपीएलमध्ये १०० व्या बळीची नोंद केली आहे. कोलकात्याच्या शुबमन गिलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत मिश्राने हे अनोखं शतक साजरं केलं. शुबमन गिल २८ धावा काढून माघारी परतला.

महत्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीच्या एकाही गोलंदाजाला आतापर्यंत अमित मिश्राने केलेली कामगिरी जमलेली नाही. भारतीय संघात अमित मिश्राला गेल्या काही वर्षांत स्थान मिळालेलं नसलं तरीही आयपीएलमध्ये दिल्लीकडून तो आपली कामगिरी चोख बजावत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याआधी, दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. शारजाच्या मैदानावरील सामन्यात आधी पृथ्वी शॉ, त्यानंतर ऋषभ पंत आणि अखेरीस श्रेयर अय्यर अशा तिहेरी तडाख्याने कोलकाताच्या गोलंदाजांना अक्षरश: नाकीनऊ आणले. श्रेयस अय्यरने अवघ्या ३८ चेंडूत नाबाद ८८ धावा कुटल्या. तर पृथ्वीने ६६ आणि पंतने ३८ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या बळावर दिल्लीने हंगामातील सर्वोच्च, २२८ धावांचा डोंगर उभारला. पंजाबने या हंगामात २२३ धावा केल्या होत्या. ते आव्हान पेलत राजस्थानने २२६ धावा केल्या होत्या.