कर्णधार विराट कोहलीचं नाबाद अर्धशतक आणि त्याला सलामीवीर देवदत पडीकलने दिलेली उत्तम साथ या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सवर मात केली आहे. ८ धावांनी सामना जिंकत राजस्थानने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. कर्णधाल विराट कोहलीला सामन्यात गवसलेला सूर हे RCB च्या विजयाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. याचसोबत सलामीवीर देवदत पडीकलने ६३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं.
राजस्थानने विजयासाठी दिलेल्या १५५ धावांचा पाठलाग करताना RCB कडून पडीकल आणि कोहलीने महत्वपूर्ण भागीदारी रचली. अर्धशतक झळकावत पडीकलने आपल्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये पहिल्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यांत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा पडीकल पहिला खेळाडू ठरला आहे. पाहूयात आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये पडीकलची कामगिरी…
- विरुद्ध हैदराबाद – ५६ धावा (दुबई)
- विरुद्ध पंजाब – १ धाव (दुबई)
- विरुद्ध मुंबई – ५४ धावा (दुबई)
- विरुद्ध राजस्थान – ५३ धावा (अबु धाबी)
पडीकलने आपल्या अर्धशतकी खेळीत ६ चौकार आणि एक षटकार लगावला. जोफ्रा आर्चरने त्याला क्लिन बोल्ड करत माघारी धाडलं. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्सने विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
