राहुल तेवतियाच्या निमीत्ताने राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात एक चांगला अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामन्यातही संघ संकटात सापडलेला असताना तेवतियाने १२ चेंडूत नाबाद २४ धावांची खेळी केली. सामन्यात अखेरचं षटक खेळत असताना नवदीप सैनीने टाकलेला बिमर चेंडू तेवतियाच्या खांद्यावर लागला. सैनीच्या चेंडूत एवढी गती होती की तेवतिया दुखापतीमुळे थेट खालीच झोपला.

अवश्य वाचा – Video : काय चाललंय काय?? रनआऊट करण्यासाठी RCB ची ‘धावपळ’

मात्र यानंतर स्वतःला सावरत तेवतियाने सैनीच्या गोलंदाजीवर षटकार खेचत आपल्या संघाला १५४ धावांचा टप्पा गाठून दिला. पाहा काय घडलं अखेरच्या षटकात…

राजस्थानच्या संघाची सुरुवातच खराब झाली. कर्णधार स्टिव्ह स्मिथ इसुरु उदानाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू नवदीप सैनीने सापळा रचत बटलरला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पडीकलकडे झेल द्यायला भाग पाडलं. बटलरने २२ धावा केल्या. यानंतर भरवशाचा संजू सॅमसनही ४ धावा काढत चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर रॉबिन उथप्पा आणि महिमाल लोमरोर यांनी संघाचा डाव सावरला. मैदानावर स्थिरावू पाहत असलेल्या रॉबिन उथप्पाला चहलने बाद करत राजस्थानला आणखी एक धक्का दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर अंकीत राजपूतच्या जागी संघात स्थान मिळालेल्या महिपाल लोमरोरने फटकेबाजी करत राजस्थानला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. परंतू अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो देखील माघारी परतला. महिपालने ३९ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह ४७ धावा केल्या. यानंतर जोफ्रा आर्चर आणि राहुल तेवतिया यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतू फॉर्मात असलेल्या RCB च्या गोलंदाजांनी इथेही राजस्थानला फारशी संधी दिली नाही. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने ३, इसुरु उदानाने २ तर नवदीप सैनीने १ बळी घेतला.