आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. यंदा भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता स्पर्धेचं आयोजन युएईत करण्यात येणार आहे. युएईमधील खेळपट्ट्यांमुळे यंदा प्रत्येक संघाला विजयाची समान संधी आहे. यंदाच्या हंगामात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत प्रत्येक सामन्यात समीकरणं बदललेली पहायला मिळू शकतील. युएईत Spinner Friendly Wicket वर यंदा फिरकीपटूंकडून संघांना अनेक अपेक्षा असणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्या संघाकडे सर्वात चांगले फिरकीपटू आहेत याचा घेतलेला हा आढावा…
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2020 रोजी प्रकाशित
Video : युएईत फिरकीपटूंवर संघांची मदार, कोणाचं पारडं असेल जड??
१९ सप्टेंबरपासून IPL च्या तेराव्या हंगामाला सुरुवात
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 14-09-2020 at 16:23 IST
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 which team have strong spinner department know here psd