गुजरात आणि लखनऊ यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौथा सामना खेळवला गेला. हा सामना अनेक अर्थांनी चर्चेत राहिला. लखनऊचा कर्णधार केएल राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झालेला असताना मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगला खेळ करत संघाला १५८ धावांपर्यंत नेऊन पोहोचवलं. दरम्यान, लखनऊने हा सामना गमावला असला तरी या संघातील बावीस वर्षीय आयुष बदोनीची सगळीकडे चर्चा होत आहे. पदार्पणातच अर्धशतक ठोकल्यामळे आय़ुष सध्या चर्चेचा विषय ठरतोय. त्याने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलच्या पंधराव्या हंगामामध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला.या सामन्यात लखनऊचा पराभव झाला मात्र चांगली धावसंख्या गाठण्यासाठी कर्णधार राहुलने अनुभवी कृणाल पांड्याला मागे ठेवले. त्याऐवजी राहुलने आयुष बदोनीला फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. मैदानावर उतरल्यानंतर सेट होण्यासाठी आयुषने अगोदर थोडा वेळ घेतला. नंतर मात्र २२ वर्षाच्या बदोनीने फटके मारायला सुरुवात केली. त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावत ४१ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. चेंडूचा सामना करताना कशाचेही दडपन न बाळगता तो जोराचे फटके मारत होता. धावसंख्येकडे लक्ष न देता बदोनी गुजरातच्या गोलंदाजांना धूत होता. त्याच्या या दमदार कामगिरीमुळेच लखनऊ १८५ धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 gt vs lsg lucknow super giants player ayush badoni scored 50 runs prd
First published on: 29-03-2022 at 00:26 IST