IPL 2022 GT vs LSG : आयपीएलच्या पंधाराव्या हंगामातील चौथा सामना आज मुंबईतीली वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ एकमेकांना भिडतील. विशेष म्हणजे या हंगामात हे दोन्ही संघा नव्याने स्थापन झाले असून दोन्ही संघांचा आजचा पहिलाच सामना असणार आहे. याच कारणामुळे हा सामन्या कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुजरात टायटन्स संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्या तर लखनऊ संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे असणार आहे. या दोन्ही फ्रेंचायझींनी राहुल आणि पांड्या यांच्यासाठी अनुक्रमे १७ आणि १५ कोटी रुपये मोजलेले आहेत. त्यामुळे कर्णधार म्हणून या दोघांकडेही मोठी जबाबदारी असणार आहे.

गुजरात टायटन्सच्या हार्दिक पांड्यासाठी आजचा सामना सोपा नसेल. आजच्या सामन्यात त्याच्या नेतृत्वाचा कस लागेल. गुजरातच्या ताफ्यात शुभमन गिल आणि राशीद खानसारखे दिग्गज खेळाडू आहेत. मात्र या दोन खेळाडूंव्यतिरिक्त संघामध्ये मधल्या फळीत मोठे खेळाडू नाहीयेत. तर गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर या संघाकडे दिग्गज गोलंदाज असून हार्दिक पांड्या गोलंदाजीमध्ये काय कामगिरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

दुसरीकडे लखनऊच्या संघाकडे गोलंदाज तसेच फलंदाजांची फळी चांगली असल्यामुळे हा संघ संतुलन राखून आहे. फलंदाजीसाठी राहुलसोबत डी कॉक, मनिष पांडे असतील तर अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा आणि क्रुणाल पांड्या हे दोन हुकमी खेळाडू लखनऊकडे असतील. तर गोलंदाजीसाठी लखनऊकडे आवेश खान आणि रवी बिश्नोईसारखे खेळाडू आहेत.

गुजरात टायटन्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड, विजय शंकर, डेव्हिड मिलर, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, आर साई किशोर

लखनऊ सुपर जायंट्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल (कर्णधार ), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, अँड्र्यू टाय, अंकित राजपूत, आवेश खान

सामना कोठे आणि कधी सुरु होणार ?

आजचा सामना आयपीएलमधील चौथा सामना असून तो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता सुरु होईल.

सामना कोठे पाहता येईल ?

आजचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि Disney plus Hotstar वर पाहता येईल. तसेच या सामन्याचे सर्व अपडेट्स loksatta.com या लोकसत्ताच्या ऑफिशियल वेबसाईटवरदेखील मिळतील.