आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ७.३० वाजता हा सामना होणार असून दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहेत. पंजाब किंग्ज आणि केकेआर या दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना जिंकल्यामुळे आजच्या सामन्यात कोणाची सरशी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोलकाताने या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नईला पराभूत करत दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर सॅम बिलिंग्स यांनी चांगली कामगिरी केली होती. आजच्या सामन्यातही हे खेळाडू उत्तम खेळ खेळतील अशी आशा आहे. तर शिवम मावी, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती यांना आजच्या सामन्यात चांगला खेळ करावा लागेल. उमेश यादवने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात दोन-दोन बळी घेत चांगली कामगिरी केली होती. आजच्या सामन्यातही उमेश सातत्य ठेवेल अशी आशा आहे. कोलकाताने आतापर्यंत चेन्नईविरोधातील सामना जिंकला असून बंगळुरुविरोधातील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय संपादन करुन गुणतालिकेत वरचा क्रमांक गाठण्यासाठी कोलकाता प्रयत्न करेल.

तर दुसरीकडे पंजाब किंग्जचे खेळाडू मैदानावर आत्मविश्वासाने वावरत असून त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात पाच गडी राखून विजय संपादन केला होता. त्यांनी २०५ धावांचा यशस्वी पद्धतीने पाठलाग केला होता. राज बावा वगळता सर्वच फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. पहिल्या फळीतील मयंक अग्रवाल, शिखर धवन यांना फलंदाजीमध्ये सातत्य ठेवावे लागेल. उमेश यादवच्या भेदक माऱ्याला या फलंदाजांना तोंड द्यावे लागेल. तर मधल्या फळीतील भानुका राजपक्षे, लिआम लिव्हिंग्स्टोन, शाहरुख खान, ओडेन स्मिथ या मधल्या फळीतील फलंदाजांना संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्याची जबाबदारी असेल.

दुसरीकडे पंजाबच्या गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीमध्ये थोडा सुधार करावा लागेल. संदीप शर्मा, अर्षदीप सिंग, ओडेन स्मिथ, राहुल चहर यांच्यावर संघाची भिस्त असेल. कोलकाताला रोखायचे असेल तर फलंदाजांना चांगली कामगिरी करुन दाखवावी लागेल. कसिगो रबाडा संघात सामील झाल्यामुळे पंजाबची गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.

केकेआरचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, शेल्डन जॅक्सन, आंद्रे रसेल, सुनील नरेन, टीम साऊथी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

पंजाबचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, राज अंगद बावा, ओडियन स्मिथ, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा.

सामना कोठे पाहता येईल ?

आजचा सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स ३ एचडी या चॅनेल्सवर हा सामना पाहता येईल. तसेच Disney Plus Hotstar app वरही हा सामना पाहता येईल. या सामन्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला loksatta.com या लोकसत्ताच्या ऑफिशिअल वेबसाईटवर मिळतील.

सामना कोठे होणार ? सामन्याची वेळ काय ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी ठीक ७.३० वाजता सुरु होईल.