इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामातील पंजाब किंग्जची कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत ११ पैकी ६ सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत पंजाबच्या संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कायम राखण्यासाठी उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. पंजाब किंग्ज आता १३ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध त्यांच्या पुढील सामना खेळणार आहे. तर पुढील दोन सामने दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध आहेत.

सलमान खानला ओळखतो का?

मैदानाबाहेर पंजाबचे खेळाडू उत्साहात दिसत आहेत. पंजाब किंग्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, अनेक परदेशी खेळाडू दिग्गज बॉलीवूड डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पंजाब किंग्जच्या काही खेळाडूंनी एका मनोरंजक खेळात भाग घेतला, जिथे संघाच्या खेळाडूंच्या बॉलीवूडबदद्ल असलेल्या माहितीची चाचणी घेण्यात आली. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला विचारण्यात आले की, तो बॉलिवूड अभिनेता सलमानला ओळखतो का? यावर रबाडाने मजेशीर उत्तर देताना सांगितले की, ‘नाही, मी राशिद खानला ओळखतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ चित्रपटातील डायलॉग ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर मैं अपने बाप की भी नहीं सुनता’ म्हणण्याचा प्रयत्न केला.

स्मिथ-एलिसही सहभागी

यामध्ये कागिसो रबाडा व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा ओडियन स्मिथ आणि नॅथन एलिस सहभागी झाले होते. यावेळी ओडियन स्मिथने ‘दामिनी’ चित्रपटातील सनी देओलचा ‘तारीख पे तारीख, तारीख पर तारीख’ हा डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एलिस बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातील ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ हा डायलॉग बोलताना दिसला.

९.२५ कोटींमध्ये रबाडा पंजाबकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने कागिसो रबाडाला ९.२५ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले होते. आयपीएलच्या गेल्या मोसमात रबाडा दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. आयपीएल २०२२ मध्ये रबाडाने आतापर्यंत १० सामन्यात १७.८४ च्या सरासरीने १८ विकेट घेतल्या आहेत. रबाडाने २०१७ मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये भाग घेतला होता. ६० आयपीएल सामन्यांमध्ये रबाडाने २०.०३ च्या सरासरीने ९४ विकेट घेतल्या आहेत.