scorecardresearch

Premium

IPL 2022 LSG vs GT : लखनऊ विरुद्ध गुजरातमधील विजेत्याला मिळणार प्लेऑफचे तिकीट; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

Lucknow Super Giants vs Gujarat Titans : लखनऊ आणि गुजरात सध्या गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत

LSG vs GT Playing XI

IPL 2022 LSG vs GT  Playing XI : लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२२ मधील ५७ वा सामना आज पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला जाईल. हे दोन्ही संघ आयपीएलचा हंगामात पहिल्यांदाच खेळत असतील, पण आतापर्यंत दोघांची कामगिरी दमदार राहिली आहे. लखनऊ आणि गुजरात सध्या गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोघांमध्ये आज जो संघ जिंकेल त्याला प्लेऑफचे तिकीट मिळेल. लखनऊ आणि गुजरातनंतर आठ संघांमध्ये तीन जागांसाठी लढत सुरू राहणार आहे. फक्त मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

लखनऊ आणि गुजरातच्या संघाला आयपीएल २०२२ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची पहिली संधी आहे कारण या दोन्ही संघांच्या खात्यात सध्या १६-१६ गुण आहेत. पॉइंट टेबलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स पहिल्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर आहे. यापैकी कोणताही संघ जिंकला तर आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरणार आहे. पराभूत संघालाही प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
ajit pawar
“माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान
hardeep singh nijjar murder case canada allegations on india
Video: “जे अमेरिकेनं लादेनबाबत केलं, तेच भारतानं…”, कॅनडाच्या आरोपांवर माजी अधिकाऱ्याचा अमेरिकेला घरचा आहेर; म्हणे, “स्वत:लाच फसवू नये”!

केएल राहुलचा भार हलका

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातला गेल्या आठवड्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे लखनऊने त्यांचे शेवटचे चार सामने जिंकले आहेत. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या शेवटच्या सामन्यातील ७५ धावांनी विजयाचा मिळवला आहे, ज्यामुळे लखनऊचा संघ उत्साहात मैदानात उतरेल. केएल राहुलने लखनऊचे नेतृत्व केले आहे. त्याने आतापर्यंत ११ सामन्यांत ४५१ धावा केल्या आहेत ज्यात दोन शतके आणि अर्धशतकांचा समावेश आहे. लखनऊचा संघ फलंदाजीत केएल राहुलवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पण अलीकडच्या सामन्यांमध्ये क्विंटन डी कॉक आणि दीपक हुडा यांनी अधिक जबाबदारी घेतली आहे, ज्यामुळे राहुलचा भार हलका झाला आहे.

रशीदच्या कामगिरीवर सर्वाची नजर

गुजरातच्या सुरुवातीच्या फळीतील फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. मुंबईविरुद्धच्या गेल्या सामन्यात शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा या सलामीवीरांनी अर्धशतके झळकावली. त्यांचा आता लखनऊविरुद्ध चांगली कामगिरी सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल. कर्णधार हार्दिक पंड्याला गेल्या चार सामन्यांत ३० धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. त्याच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. मात्र, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया आणि रशीद खान हे विजयवीराची भूमिका सक्षमपणे बजावत आहेत. फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीतही फिरकीपटू रशीदच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.

गुजरात आणि लखनऊची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (क), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, प्रदीप संगवान/यश दयाल, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.

लखनऊ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (क), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पांड्या, आयुष बडोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान, मोहसिन खान.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-05-2022 at 15:42 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×