scorecardresearch

PBKS vs CSK : पंजाबच्या गब्बरची धडाकेबाज खेळी, एकाच सामन्यात धवनने रचले दोन मोठे विक्रम !

आजच्या सामन्यात पहिल्या सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या शिखर धवनने धडाकेबाज फलंदाजी केली.

shikhar dhawan
शिखर धवन (फोटो- iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३८ वा सामना चेन्नई आणि पंजाब यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात पंजाबची गब्बर खेळाडू शिखर धनवनने धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने नाबाद ८८ धावा करत या सामन्यात दोन नवे विक्रम रचले आहेत.

आजच्या सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या शिखर धवनने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने मैदानात येताच जोरदार फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी केली. धवनच्याच फलंदाजीमुळे पंजाबला १८७ धावसंख्येपर्यंत मजल मारत आली. त्याने ५९ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि दोन षटकार लगावत ८८ धावा केल्या. ही धावसंख्या उभारताना त्याने दोन मोठे विक्रम नोंदवले आहेत.

हेही वाचा >> सामना पंजाबचा, पण चर्चा मात्र मालकिणीची; प्रीति झिंटाने वेधले सर्वांचे लक्ष

शिखर धवनचा आयपीएलमधील हा २०० वा सामना होता. मैदानात उतरताच तो २०० आयपीएल सामने खेळणारा आठवा खेळाडू ठरला. यामध्ये धोनी प्रथम क्रमांकावर आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २२८ सामने खेळले आहेत. तसेच या विक्रमासोबतच धवननने आयपीएलमध्ये ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये सहा हजार धावांपर्यंत मजल मारणारा धवन दुसरा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीच्या नावावर ६४०२ धावा असून तो प्रथम क्रमांकावर आहे. रोहित शर्मा तिसऱ्या तर डेव्हिड वॉर्नर चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा >> IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जसमोर नवं संकट, दिग्गज खेळाडू जखमी

दरम्यान सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने चेन्नईसमोर १८८ धावांचे लक्ष्य ठेवले. यासाठी शिखर धवनने नाबाद ८८ धावा केल्या. तर भानुका राजपक्षेने ४२ धावा करत पंजाबला १८७ ही धावसंख्या गाठण्यासाठी मदत केली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 pbks vs csk shikhar dhawan made two records crossed six thousand runs prd

ताज्या बातम्या