आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहे. प्रत्येक सामन्यात चुरशीची लढत होत असल्यामुळे कोणता संघ सरस ठरणार हे सांगणे अवघड झाले आहे. दरम्यान या हंगामातील ३९ वी लढत आज रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्याला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे. आयपीएलचा अर्धा हंगाम संपलेला आहे. प्रत्येक संघाने कमीत कमी ७ सामने खेळलेले आहेत. त्यामुळे येथून पुढे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ विजयासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहेत.

दोन्ही संघ पूर्ण ताकतीने लढणार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज लढत होणार आहे. सध्या राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून या संघाने एकूण सातपैकी पाच सामने जिंकलेले आहेत. तर दोन सामन्यांत या संघाचा विजय झालेला आहे. तर दुसरीकडे बंगळुरु संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी असून टॉपच्या चार संघामध्ये समाविष्ट होण्यासाठी या संघाला आजचा विजय आवश्यक आहे. या संघाने एकूण आठ सामने खेळलेले असून यातील पाच सामन्यात विजय तर उर्वरित तीन सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे.

विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष

आजच्या सामन्यात बंगळुरु संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली कशी कामगिरी करणार हे पाहणे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. मागील सामन्यात तो खातंही न खोलता तंबुत परतला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात तो चांगली खेळी करेल अशी अपेक्षा केली जातेय.

बंगळुरु संघाचा प्लेइंग इलेव्हन

अनुज रावत, फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, शाहबाज अहमद, सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज</p>

राजस्थान संघाचा प्लेइंग इलेव्हन

देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, संजू सॅमसन (सर्णधार आणि यष्टीरक्षक) रियान पराग, करुण नायर, ट्रेंट बोल्ट, रविचंद्रन अश्विन, ओबेड मॅककॉय, प्रसिध कृष्णा, युजवेंद्र चहल