आयपीएलचा पंधरावा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. आता सर्वांनाच प्लेऑफच्या सामन्यांचे वेध लागले आहे. असे असताना आज या पर्वातील शेवटचा साखळी सामना पंजाब किग्ज आणि सनरायझर्स हैदरबाद यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता खेळवला जातोय.

हेही वाचा >> ऋषभ पंतने न घेतलेला रिव्ह्यू महागात; मुंबई विजयी, दिल्ली प्लेऑफच्या बाहेर

या दोन्ही संघांचे या पर्वातील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आजचा सामना हा फक्त औपचारिकता म्हणूनच खेळवला जातोय. मात्र हा सामना म्हणजे औपचारिकता जरी असला तरी शेवटच्या सामन्यात चांगळी खेळी करुन विजय संपादन करण्यासाठी दोन्ही संघ धडपड करताना दिसतील. गुणतालिकेत पंजाब किंग्ज आणि हैदराबाद हे संघ अुनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमाकांवर आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून वरचे स्थान गाठण्यासाठी हे दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसतील.

हेही वाचा >> सामना मुंबई-दिल्लीचा, पण बंगळुरुला लाभ; ‘पलटण’च्या विजयामुळे विराटचा संघ थेट प्लेऑफमध्ये

या हंगामात पंजाब आणि हैदराबाद या दोन्ही संघांना यावेळी सूर गवसला नाही. वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देऊनही हे संघ आपले बेस्ट प्लेइंग इलेव्हन देऊ शकले नाहीत. परिमाणी या दोन्ही संघांना विजयापेक्षा पराभवालाच तोंड द्यावे लागले. आजच्या सामन्यात दोन्ही फ्रेंचायझी नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकते. हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यम्सन न्यूझिलंडला त्याच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार संघाचे नेतृत्व करु शकतो. तसेच या सामन्यात हैदराबादकडून विल्यम्सनच्या जागेवर ग्लेन फिलिप्सला संधी दिली जाऊ शकते.

हेही वाचा >> प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरुच्या खेळाडूंनी हे काय केलं? MI vs DC सामन्यात मुंबईच्या विजयासाठी…

सनरायझर्स हैदराबाद संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, प्रियाम गर्ग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), फजलहक फारुकी, उमरान मलिक, टी नटराजन/कार्तिक त्यागी

हेही वाचा >> पृथ्वी शॉ चांगलाच गोंधळला, जसप्रितच्या बाऊन्सरचा सामना करताना थेट खाली कोसळला; झाला झेलबाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाब किंग्ज संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे/शाहरुख खान, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग</p>