चेन्नई सुपर किंग्जनं आपलं पाचवं जेतेपद पटकावत यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये विजयी पताका फडकावली. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सच्या पाच जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. धोनी ब्रिगेड तब्बल १० वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळली आहे. त्यापैकी पाचवेळी त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे सीएसकेच्या नावावर हा विक्रम आता प्रस्थापित झाला आहे. धोनीसाठीही १० आयपीएल अंतिम सामने हा विक्रम त्याच्या विक्रमी आकडेवारीत भर घालणारा ठरला आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या त्या शुबमन गिलनं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरात टायटन्ससाठी शुबमन गिलनं आपल्या बॅटिंगच्या जोरावर अनेक सामन्यांमध्ये विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शुबमन गिलनं सर्वाधिक अर्थात तब्बल ८९० धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे शुबमन गिल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. पण त्याचबरोबर शुबमनला गेम चेंजर ऑफ द सीजन आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन हे दोन पुरस्कारही मिळाले आहेत. विशेष म्हणजे, चेन्नईनं आयपीएलच्या या सीजनचं जेतेपद पटकावलं असलं, तरी संघातील इतर कोणत्याही खेळाडूला वेगळा पुरस्कार मिळाला नसून गुजरात टायटन्सकडे मात्र ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप हे दोन्ही महत्त्वाचे पुरस्कार गेले आहेत!

CSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा!

वाचा कुणाला कोणता पुरस्कार मिळाला

आयपीएल २०२३ जेतेपद – चेन्नई सुपर किंग्ज</p>

इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन – यशस्वी जयस्वाल
सुपर स्ट्राईकरेट ऑफ द सीजन – ग्लेन मॅक्सवेल (१८९.४९)
गेम चेंजर ऑफ द सीजन – शुबमन गिल

परफेक्ट कॅच ऑफ द सीजन – राशिद खान<br>पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) – मोहम्मद शामी (२८ विकेट्स)
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) – शुबमन गिल (८९० धावा)
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन – शुबमन गिल
फेअर प्ले अवॉर्ड – दिल्ली कॅपिटल्स

आयपीएलच्या यंदाच्या सीजननंतर महेंद्रसिंह धोनी निवृत्ती स्वीकारणार अशा चर्चा रंगल्या होत्या. माहीनंही तसे सूतोवाच दिले होते. मात्र, अखेर माहीनं पुढील वर्षीही आयपीएल खेळण्यासाठी मेहनत करणार असल्याचं सांगत निवृत्तीच्या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम दिला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 csk vs gt ms dhoni brigade wins fifth title awards list of final match pmw
First published on: 30-05-2023 at 09:11 IST