Yashasvi Jaiswal vs Suyash Sharma: यशस्वी जैस्वालने आयपीएल २०२३मध्ये आक्रमक खेळी खेळून राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. टी२० लीग सामन्यात २१ वर्षीय यशस्वीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केवळ १३ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचे शतक थोडक्यात हुकले, शेवटी ९८ धावा करून तो नाबाद राहिला. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉयल्सने १३.१ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. या सामन्यात केकेआरचा युवा लेगस्पिनर सुयश शर्माच्या एका कृतीवर बरीच टीका होत आहे.

सुयश शर्मा राजस्थान रॉयल्सच्या डावातील १३वे षटक टाकत होता. शेवटच्या चेंडूवर कर्णधार संजू सॅमसन समोर होता आणि रॉयल्सला विजयासाठी फक्त ३ धावांची गरज होती. दुसरीकडे, नॉन स्ट्राइक एंडला उभा असलेला यशस्वी जैस्वाल ९४ धावांवर नाबाद होती. अशा स्थितीत सुयशने शेवटचा चेंडू वाईड टाकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून यशस्वीचे शतक रोखता येईल. संजू सॅमसनने क्रीझच्या पुढे जाताना चेंडू रोखला आणि यशस्वीला संकेत दिला की आता षटकार मारून शतक पूर्ण करावे.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?

कोलकाता नाईट रायडर्सचा युवा मिस्ट्री स्पिनर सुयश शर्माने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली होती, मात्र आयपीएल २०२३मध्ये गुरुवारी (११ मे) ईडन गार्डन्स मैदानावर सुयशने असे कृत्य केले, ज्यामुळे आता सर्व क्रिकेट चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. वास्तविक, यशस्वीचे शतक पूर्ण न करण्याच्या प्रयत्नात सुयशने वाइड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु स्ट्रायकरच्या शेवटी असलेल्या संजू सॅमसनने आपल्या बॅटने चेंडू रोखला आणि त्याचा प्रयत्न हाणून पाडला.

सुयशचे हे कृत्य पाहून तमाम क्रिकेट चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत. इतकंच नाही तर कोलकाता नाईट रायडर्सचा माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा देखील सुयशच्या खराब कृत्यावर चांगलाच संतापलेला दिसला. आकाश चोप्राने सुयशला फटकारले आणि त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले.

हेही वाचा: Yashasvi Jaiswal Fastest Fifty: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास! IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत? जाणून घ्या

जर पाकिस्तानी गोलंदाजांनी असे केले असते तर- आकाश चोप्रा

आकाशने लिहिले की, “विराट कोहलीला शतक पूर्ण करण्यापासून रोखण्यासाठी एखाद्या पाकिस्तानी गोलंदाजाने असे केले तर कल्पना करा… त्यामुळे जे ज्ञान देत आहेत की वाइड गोलंदाजी करणे पूर्णपणे ठीक आहे त्यांनी जरा आत्मपरीक्षण करावे, हे जाणूनबुजून केले गेलेले नाही. या गोष्टीला आपण योग्य म्हटले तर तो काही मिनिटांतच सोशल मीडियावर ट्रेंड सुरु होईल. या जागी जर पाकिस्तानी गोलंदाज असता आणि त्याने असे केले असते तर तो सोशल मीडियावर ट्रोल झाला असता त्यात आणखी ट्रोलिंगची पातळी वेगळी असती.”

विशेष म्हणजे केकेआर विरुद्ध आरआर सामन्यादरम्यान जेव्हा ही घटना घडली तेव्हा यशस्वीला षटकार मारून शतक पूर्ण करण्याची संधी होती, परंतु येथे यशस्वीने संघाचा विजयाला पहिले प्राधान्य दिले आणि चौकार मारून राजस्थानला सामना जिंकून दिला. यशस्वीने ४७ चेंडूत नाबाद ९८ धावा केल्या. या दरम्यान त्याने फक्त १३ चेंडूत आपला अर्धशतक पूर्ण केले, जे आता आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे.