scorecardresearch

Delhi Capitals on Pant: दिल्ली कॅपिटल्सच्या डगआउटमध्ये ऋषभ पंतची खास एंट्री; संघाने केली मन जिंकणारी खास कृती व्हायरल

Rishabh Pant in Delhi Capitals Dugout: दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा नियमित कर्णधार ऋषभ पंतची जर्सी डगआउटच्या छतावर टांगली असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

IPL 2023: Rishabh Pant seen in the dugout of Delhi Capitals the team's winning comment went viral
सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

Rishabh Pant in Delhi Capitals Dugout: दिल्ली कॅपिटल्स संघ लखनौच्या एकना स्टेडियमवर यजमान लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्याने आयपीएल २०२३ मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करत आहे. दिल्ली संघाने या मोसमात आपला नियमित कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतशिवाय प्रवेश केला आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग म्हणाले होते की, ऋषभ पंत संघासोबत डगआउटमध्ये बसेल.

दिल्ली कॅपिटल्सची जर्सी लाँच करताना पाँटिंगने हे सांगितले. त्यावेळी त्याचे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता आणि आता पाँटिंगने तेच करून दाखवले आहे. होय. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान ऋषभ संघासोबत नसतानाही डगआऊटमध्ये दिसला. दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा नियमित कर्णधार ऋषभ पंतची जर्सी डगआउटच्या छतावर टांगली असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून आता सगळेच दिल्लीच्या टीमचे कौतुक करत आहेत. फोटोमध्ये, दिल्ली फ्रँचायझीचे क्रिकेट संचालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली रिकी पाँटिंगसह ऋषभ पंतच्या जर्सीखाली डगआउटमध्ये स्पष्टपणे दिसू शकतात.

दुखापतीमुळे पंत यावेळी आयपीएलमध्ये खेळणार नसला तरी दिल्ली कॅपिटल्सच्या प्रत्येक खेळाडूला त्याची उणीव भासत आहे. याच कारणामुळे आयपीएल २०२३च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्ली संघाने ऋषभ पंतची जर्सी डग आऊटमध्ये टांगली होती, ज्याचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋषभ पंतच्या जर्सीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत दिल्ली कॅपिटल्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नेहमी आमच्या डगआउटमध्ये. नेहमी आमच्या टीममध्ये. आमच्यासोबतच आहे.”

दिल्लीसमोर १९४ धावांचे आव्हान

दिल्ली कॅपिटल्ससमोर ऋषभ पंतची जर्सी डग आऊटवर टांगली होती आणि त्यांच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली. दिल्लीच्या चेतन सकारियाने चौथ्या षटकात लखनऊचा कर्णधार लोकेश राहुल (८) याला बाद केले. कायले मायर्सचा सोपा झेल खलिल अहमदने टाकला अन् तोच महागात पडला. त्याने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दीपक हुडा व मायर्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. यापैकी ६२ धावा (२४ चेंडू) या मायर्सने चोपल्या होत्या. कुलदीप यादवच्या गुगलीवर हुडा (१७) झेलबाद झाला.

हेही वाचा: IPL 2023, LSG vs DC: काईल मेयर्सचे तुफानी अर्धशतक! लखनऊ सुपर जायंट्सचे दिल्ली कॅपिटल्ससमोर १९३ धावांचे आव्हान

लखनऊने कृणाल पांड्याला प्रमोशन देताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. मायर्स आज वादळ आणतोय असे दिसत असताना अक्षर पटेलने अप्रतिम चेंडू टाकला. मायर्स ३८ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ७३ धावांवर त्रिफळाचीत झाला. डोकेदुखी ठरणाऱ्या मार्कस स्टॉयनिसला (१२) खलिलने बाद करून दिल्लीला मोठं यश मिळवून दिले. पूरनने २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. खलिलच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉने चांगला झेल टिपला. खलिलने ३० धावांत दोन विकेट्स घेतल्या. लखनऊने २० षटकांत ६ बाद १९३ धावा केल्या. दिल्लीने अखेरच्या चेंडूवर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून के गौथमला पाठवले अन् त्याने षटकार खेचला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 22:23 IST

संबंधित बातम्या