scorecardresearch

Premium

IPL 2023: मुंबई इंडियन्समध्ये दोन पाकिस्तानी खेळाडूंची एन्ट्री, शाहरुख खाननेही KKRमध्ये केला एका खेळाडूचा समावेश, जाणून घ्या

आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास बंदी घातली आहे पण तरीदेखील मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना खेळण्याची संधी दिली.

IPL2023: Entry of 2 Pakistani players in Mumbai Indians Shah Rukh Khan also included one player in KKR
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

आयपीएल २०२३ ची १६वी आवृत्ती ३१ मार्चपासून सुरू होत आहे. सर्वात महागड्या आणि लोकप्रिय टी२० लीग आयपीएलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात ३१ मार्च रोजी होणार आहे. पण याच दरम्यान एक अशी बातमी आली जी भारतीय क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी आहे. कारण आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स आणि शाहरुखच्या टीम केकेआरने असे काही केले आहे की ज्याची कुणालाही अपेक्षा नसेल.

आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडिअन्सने पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना आपल्या संघात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमधील सघांमध्ये खेळणार असल्याने सगळीकडे याची जोरदार चर्चा आहे. चाहत्यांनाही धक्का बसला आहे की पहिल्या पर्वानंतर आतापर्यंत पाकिस्तानचे खेळाडू खेळले नाहीत. आता असं काय झालं की फ्रँचायझीने त्यांना सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
justin trudea canada india conflict
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ पाकिस्तानात होणार! भारताच्या सामन्याबाबत घेतला मोठा निर्णय, कुठला असेल वेन्यू?

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता संघात पाकिस्तानी खेळाडूंना संधी

आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सने असे काही केले आहे ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. वास्तविक मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दोन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केला आहे. एमआयने हमाद आझम आणि अहसान आदिल यांना त्यांच्यासोबत जोडले आहे. २००८ नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला त्यांच्याशी जोडले आहे, म्हणूनच ही बातमी येताच आगीसारखी पसरली आहे.

आयपीएलच्या धर्तीवर मेजर लीग क्रिकेट लवकरच अमेरिकेत सुरू होत आहे. या लीगमध्ये मुंबई इंडियन्सने एमआय न्यूयॉर्क नावाचा संघही विकत घेतला आहे. या संघासाठी दोन्ही पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी करण्यात आले आहे. हे दोन्ही खेळाडू केवळ मेजर लीग क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू हम्माद आझम आणि एहसान आदिल यांचा इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघात प्रवेश करण्यात आला आहे. याबाबत मुंबई इंडिअन्सच्या सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. मात्र आयपीएलमध्ये नाहीतर यंदा जुलैमध्ये अमेरिकेमध्ये मेजर क्रिकेट लीग खेळवली जाणार आहे. या लीगमध्ये आयपीएलमधी चार फ्रँचायझीने आपले संघ उतरवले आहेत.

हेही वाचा: Rahul Dravid: अखेर राहुल द्रविडने अनुभवी फिरकीपटूसोबत काम करण्यास का दिला नकार? ट्विटरवर केला माजी खेळाडूने खुलासा

यामधील मुंबई इंडिअन्स संघाने हम्माद आझम आणि एहसान आदिल यांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. हम्माद आझमने २०११ ते २०१५ पर्यंत पाकिस्तानसाठी ११ एकदिवसीय आणि पाच टी२० सामने खेळले. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. त्याचबरोबर एहसानने पाकिस्तानकडून तीन कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. एहसान आयसीसी विश्वचषक २०१५ मध्ये पाकिस्तान संघामध्ये होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 15:07 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×