भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (२२ मार्च) चेन्नई येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने २१ धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने वनडे मालिका २-१ अशी जिंकली. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित सर्व पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी त्याने भारतीय संघाच्या पराभवाचे कारण सांगितले. त्यात आणखी भर म्हणजे भारताचे माजी दिग्गज खेळाडू आणि फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी खळबळजनक खुलासा केला आहे.

भारताचा माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन याने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडबाबत मोठा खुलासा केला आहे. लक्ष्मणने सांगितले की मी द्रविडसोबत टीम इंडियासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु सध्याच्या मुख्य प्रशिक्षकाने त्याची ऑफर नाकारली. अलीकडेच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनमन या त्रिकुटाने भारतीय संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली होती. याशिवाय वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात ॲश्टन अगर आणि ॲडम झॅम्पा यांनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

कुलदीपने क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी केली नाही

खरं तर, तिसर्‍या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर एका चाहत्याने ट्वीट केले, “मला असे जाणवले की कुलदीप यादवने सजवलेल्या क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी केली नाही. झॅम्पा जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा स्मिथने खूप आक्रमक क्षेत्र ठेवले होते.” तसेच क्षेत्ररक्षण सेटिंग अ‍ॅश्टन अ‍ॅगर गोलंदाजी करत असतानाही तो परिपूर्ण होता.” चाहत्याने आपल्या ट्विटमध्ये लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना टॅग केले आणि म्हटले की अशा परिस्थितीत तुम्हाला तज्ञाची गरज आहे.

माजी फिरकीपटूने द्रविडबाबत खुलासा केला

चाहत्याच्या ट्वीटला उत्तर देताना माजी फिरकीपटूने द्रविडबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने लिहिले, “मी राहुल द्रविडला माझी सेवा ऑफर केली आणि त्याने सांगितले की मी त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी खूप वरिष्ठ खेळाडू आहे.” तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अ‍ॅडम झॅम्पा आणि अ‍ॅश्टन अगर या जोडीने मिळून सहा भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, ज्यात कोहली, राहुल आणि हार्दिक पांड्यासारख्या मोठ्या नावांचाही समावेश होता.

हेही वाचा: IND vs AUS: “एखाद्याला वाचवायला गेलात तर हा खेळ…”, अजय जडेजाने ‘मिस्टर ३६०’वर केले सूचक विधान; रोहितलाही दिला सल्ला

उभय संघांतील या मालिकेचा विचार केला, तर पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्सच्या अंतराने सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने १० विकेट्स राखून विजय मिळवलेला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी ऑस्ट्रेलियाने २१ धावांच्या फरकाने नावावर केला. तिसऱ्या सामन्याचा नायक फिरकीपटू अ‍ॅडम झॅम्पा ठरला. त्याने ऑस्ट्रेलियासाठी ४ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाला विजायासठी २७० धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे संघाला गाठता आले नाही. भारतासाठी एकट्या विराट कोहली याने अर्धशतकी खेळी केली.