MI vs CSK IPL 2023 Dhoni: विश्वविजेता क्रिकेटपटू क्रिस श्रीकांतने 5 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्याच्या शानदार खेळासाठी आशीर्वाद दिले. मुंबईतील एका हॉटेलमध्ये श्रीकांत आणि मुरली विजय चेन्नईच्या खेळाडूंशी भेटले. दरम्यान, दोघांनीही सीएसकेच्या सर्व खेळाडूंची भेट घेतली आणि काही वेळ चर्चा केली. चेन्नई सुपर किंग्सने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये श्रीकांत चेन्नईच्या खेळाडूंना भेटतात. ते पहिल्या सत्रात CSKच्या सपोर्ट स्टाफचा एक भाग होते आणि त्यांनी टीम मेंटॉर आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडरची भूमिका बजावली आहे.

विजय आणि श्रीकांत सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग, फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी, गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि एमएस धोनी यांना भेटतात. श्रीकांतने फ्लेमिंगला त्याच्या तब्येतीची विचारणा केली तेव्हा त्याने जडेजाला मिठी मारली. त्याचवेळी विजय आणि हसी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर बोलताना दिसत आहेत.

mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
kl rahul
विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

मुरली विजय नंतर ब्राव्होला त्याच्या आईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ऐकू आला. दरम्यान, धोनी बाहेर येतो आणि श्रीकांत यांच्याशी हस्तांदोलन करतो. त्यानंतर धोनी त्यांना विचारतो की, “तुम्ही येत आहात की जात आहात. श्रीकांत त्याला उत्तर देतात, “सलाम तुम्हाला बॉस. मी समालोचन करत आहे. मला मजा येत आहे तू ते षटकार मारलेस तेव्हा मला खूप आनंद झाला.”

धोनीच्या खांद्यावर थोपटून गेला श्रीकांत

धोनीला श्रीकांत मिठी मारून म्हणतात, “अजूनही स्ट्राँग आहेस आणि हे मी प्रामाणिकपणे मनापासून सांगत आहे. तुला भेटून मला खूप आनंद झाला आहे. देव तुमचे भले करो.” श्रीकांत त्याच्या खांद्यावर शाबासकी देत हात थोपटतो आणि निघून जातो. जेव्हा धोनी आणि मुरली विजय भेटतात तेव्हा सीएसकेचा कर्णधार त्याच्या जुन्या जोडीदाराच्या आठवणीत रमतो.

हेही वाचा: IPL 2023: पाकिस्तानमध्ये वादळी खेळी करणाऱ्या फलंदाजाची केकेआरमध्ये एंट्री, आजच्या सामन्यात बंगळुरूला देणार का आव्हान?

आयपीएल २०२३ मध्ये चेन्नईच्या पहिल्या होम मॅचमध्ये धोनीने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सलग दोन षटकार ठोकले. जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये गणले जाणारे मार्क वुडवर त्याने हे षटकार ठोकले. सीएसकेने हा सामना १२ धावांनी जिंकून स्पर्धेत खाते उघडले. चेन्नईला आता मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे. या दोघांमध्ये ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. मुंबई दुसरा आणि चेन्नई तिसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला होता.