आयपीएलच्या १६व्या मोसमात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर गौतम गंभीरने वाद घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. विराट कोहलीसोबत त्याचे भांडण २०१३ पासून आहे जेव्हा गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत असे.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीसोबत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे मतभेद अनेकवेळा सर्वांसमोर आले आहेत. असे मानले जाते की विराट व्यतिरिक्त, टीम इंडियाचा माजी कर्णधार एम.एस धोनीसोबतही गंभीरचे संबंध चांगले राहिले नाहीत. गंभीरने अनेकवेळा अशा गोष्टी जाहीरपणे बोलून दाखवल्या आहेत, ज्यामुळे असे दिसते की त्याला धोनी फारसा आवडत नाही. इंडियन प्रीमियर लीग मध्ये विराट कोहली आणि गंभीरमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. गौतम गंभीर हा लखनऊ सुपर जायंट्सचा (एलएसजी) मार्गदर्शक आहे, तर विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (आरसीबी) खेळतो. १ मे रोजी उभय संघांमध्ये सामना झाला होता आणि या सामन्यानंतर विराट आणि गंभीर यांच्यात तू-तू मैं-मैं झाले होते. दरम्यान, माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने गंभीरबद्दल अशी एक गोष्ट बोलली, जी सध्या खूप व्हायरल होत आहे.

LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Updates
KKR vs RR : कोलकातामध्ये आरआर आणि केकेआर यांच्यातील सामन्यात होऊ शकतो बदल, जाणून घ्या काय आहे कारण?
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

हेही वाचा: Manipur Violence: “माझ्या धगधगत्या मणिपूरला वाचवा,” मेरी कोमवर भावनिक साद घालण्याची वेळ का आली? पाहा Video

आयपीएल२०२३ मध्ये, लखनऊ आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना बुधवारी लखनऊमध्ये झाला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. मात्र, पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. या सामन्यापूर्वी झालेल्या चर्चेत इरफान म्हणाला होता, “जेव्हा गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार होता, तेव्हा तो एम.एस. धोनीच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली होती. धोनीला वर्षानुवर्षे अडचणीत आणणारा तो एकमेव खेळाडू आहे.” त्यावेळी धोनीसह इरफान पठाण पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग होता. इरफान पठाणने सांगितले की, “धोनी यामुळे खूप त्रासला होता.”

हेही वाचा: IPL2023: “बेन स्टोक्स क्या होता है, मेरे बच्चे समझते हैं…’ वीरेंद्र सेहवागने कोहली- गंभीरला खूप काही सुनावले

इरफान पुढे म्हणाला, “गौतम गंभीर हा एकमेव खेळाडू आहे ज्याने धोनीच्या अहंकाराला आव्हान दिले. २०१६च्या आयपीएलमध्ये मला आठवते की गंभीरने धोनीविरुद्ध कसोटीसारखी क्षेत्ररक्षण लावले होते. त्या वर्षी मी धोनीच्या पुणे सुपरजायंट्स संघात होतो.” पठाण पुढे म्हणाला, “गंभीर त्याच्या योजनेत यशस्वी झाला. जेव्हा मी धोनीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो आतून अस्वस्थ झाला होता. मी धोनीला जेवढा ओळखतो, तो नेहमीच शांत आणि मस्त असतो, पण गंभीरने त्याला मानसिक दृष्ट्या अस्वस्थ केले.”