Mumbai Indians: पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेला संघ मुंबई इंडियन्सने संघात एक बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फला दुखापत झाल्याने त्याच्या जागी इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ल्यूक वुडचा त्यांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. २८ वर्षीय वुड ५० लाख रुपये किमतीसह मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. वुडने इंग्लंडकडून पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आठ विकेट्स आहेत.

IPL च्या मागील हंगामातील १२ सामन्यांत १४ विकेट्स घेणारा आणि मुंबईच्या गोलंदाजी विभागाचा मुख्य गोलंदाज असलेल्या जेसन बेहनड्रॉफला दुखापतीमुळे या मोसमातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी संघात सामील केलेला इंग्लंडचा डावखुरा वेगवान ज्याचे इनस्विंगर्स हे पाहण्यासारखे असतात.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals today match sport news
दिल्लीची आज गुजरातशी गाठ
Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी

डावखुरा वेगवान गोलंदाज ल्यूक वुडने पाकिस्तान सुपर लीग (PSL 2024) मध्ये पेशावर झाल्मी संघासाठी चमकदार कामगिरी केली. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी, चेंडू रिव्हर्स स्विंग करण्याची त्याची क्षमता सर्वोत्तम फलंदाजांनाही चकित करणारी आहे. त्याने जगभरातील विविध टी-२० लीग खेळल्या आहेत आणि आपल्या अष्टपैलू कौशल्याने सर्वांना प्रभावित केले आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने पेशावर झल्मीसाठी सर्वाधिक १२ विकेट घेतले. PSL टी-२० स्पर्धेत तो सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. वुडने सलग दोन वर्षे टी-२० ब्लास्ट मेडल पटकावले आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या नावे काउंटी चॅम्पियनशिपचे शतकही आहे.

ल्युक वुड नुकताच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे, ज्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ल्युक वुड ही मराठीत बोलताना दिसत आहे. व्हिडिओचा शेवटी’ ल्यूक वुड आला रे’ असे म्हणत तो दिसत आहे.