चेन्नईच्या घरच्या मैदानावर झालेल्या सीएसके आणि केकेआरच्या सामन्यात रवींद्र जडेजाने चाहत्यांची चांगलीच फिरकी घेतली. संघाला विजयासाठी ३ धावांची गरज असताना शिवम दुबे क्लीन बोल्ड झाला. त्यामुळे त्याच्यानंतर जडेजा फलंदाजीला येणार हे निश्चित होते. कारण महेंद्रसिंह धोनी ७किंवा ८व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. असं असतानाही चेपॉकच्या चाहत्यांना या मोसमात धोनीला प्रथमच त्यांच्या मैदानावर फलंदाजी करताना पाहण्याची संधी मिळेल अशी आशा होती. धोनीनेही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत चाहत्यांची ही इच्छा पू्र्ण केली. पण त्याआधी जडेजाने चाहत्यांची मजा घेतली ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

– quiz

raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
Ruturaj Gaikwad and MS Dhoni in IPL 2024
IPL 2024: धोनी व ऋतुराज एकमेकांना मान देताना; ‘ईगो’च्या जगातलं दुर्मिळ दृश्य
IPL 2024 Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मयंक यादव आहे तरी कोण?
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

महेंद्रसिंह धोनी फलंदाजीला येणार या अपेक्षेने चाहते खूप उत्सुक होते. सर्वांच्या नजरा या चेन्नईच्या डगआऊटवर खिळल्या होत्या. तेवढ्यात रवींद्र जडेजा बॅटिंग किट घालून ड्रेसिंग रूममधून बाहेर आला. जणू काही तो फक्त फलंदाजीसाठीच जात होता. त्याला पाहताच प्रेक्षकांचा आवाज थोडा कमी झाला, पण नंतर थोडे पुढे गेल्यावर जडेजा वळला आणि ड्रेसिंग रूममध्ये परतला. हे पाहून CSK च्या डगआऊटमध्ये बसलेल्या सपोर्ट स्टाफलाही हसू आवरता आले नाही.

रवींद्र जडेजा आतमध्ये गेल्यानंतर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला जाण्यासाठी ड्रेसिंग रूममधून बाहेर आला. ड्रेसिंग रूममधून बाहेर येताच लोकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोष सुरू होता. धोनीला फलंदाजी येताना पाहून चाहत्यांचा आवाज पार टिपेला पोहोचला होता, १२५ डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद झाली होती. धोनीने ३ चेंडूत एका धावेची नाबाद खेळी केली. धोनीनने सामन्यातील विजयी धाव घेण्याची संधीही ऋतुराज गायकवाडला दिली.

रवींद्र जडेजा आणि इतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर, कर्णधार ऋतुराज गायकवाड (नाबाद ६७) याच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसकेने केकेआरचा ७ गडी राखून पराभव केला. ‘सामनावीर’ ठरलेल्या जडेजाने चार षटकांत १८ धावा देत ३ विकेट घेतले. चेन्नईच्या चमकदार गोलंदाजीमुळे केकेआरचा संघ नऊ बाद १३७ धावाच करू शकला. सीएसकेने १७.४ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.