Shah Rukh Khan Smoking video viral: कोलकाता आणि हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यातील सामन्यादरम्यान शाहरुख खान खुलेआम धूम्रपान करताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलमधील २०२४ मधील तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा ४ धावांनी रोमांचक विजय नोंदवला. हा सामना पाहण्यासाठी केकेआरचा मालक शाहरुख खान ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये उपस्थित होता. यावेळी तो धूम्रपान करताना कॅमेऱ्यात कैद झाला. शाहरुख स्टेडियममधील व्हीआयपी बॉक्समध्ये धुम्रपान करताना दिसला.

सामना संपल्यानंतर केकेआरचा मालक शाहरुख खानने केकेआरच्या सर्व खेळाडूंची भेट घेतली. खेळाडूंशिवाय ग्राउंड स्टाफ सदस्यांसोबतही त्याचे फोटो काढण्यात आले. क्रिकेट स्टेडियममध्ये शाहरुख खानबाबत वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ग्राऊंड स्टाफशी वाद घातल्याप्रकरणी त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणाने बरेच लक्ष वेधले होते, परंतु ईडन गार्डन्सवरील त्याच्या धूम्रपानाच्या घटनेवर बंगाल क्रिकेट असोसिएशन काय कारवाई करेल याबद्दल सध्या कोणतेही माहिती समोर आलेली नाही.

LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान

KKR vs SRH: सामन्याचा लेखाजोखा

केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना खूपच अटीतटीचा होता. कोलकाता संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या सामन्यात सनरायझर्सचा नवा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. केकेआरच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही पण खालच्या फळीतील विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेलच्या शानदार फलंदाजीमुळे संघाने २०८ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात हेनरिक क्लासेनच्या उत्कृष्ट अर्धशतकी खेळीनंतरही सनरायझर्सला २० षटकांत केवळ २०४ धावाच करता आल्या.

१७व्या षटकानंतर सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या पाच विकेट्सवर १४९ धावा होती. त्यांना विजयासाठी १८ चेंडूत ६० धावांची गरज होती. सामना त्यांच्या हाताबाहेर गेला होता, पण पुढच्या तीन षटकात क्लासेनने सहा षटकार आणि शाहबाजने दोन षटकार मारले आणि सामन्याचा रोख आपल्या बाजूने वळवला. यामुळे १९व्या षटकानंतर ५ बाद १९६ धावा झाल्या होत्या आणि विजयासाठी सहा चेंडूत १३ धावा हव्या होत्या. पण हर्षित राणाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर क्लासेन आणि शाहबाज या दोघांनाही झेलबाद करवत कोलकाता संघाला ४ धावांनी विजय मिळवून दिला.