Will MS Dhoni Play For CSK In IPL 2025 Suresh Raina Responds : चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा मागील काही वर्षांपासून सुरु आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाच्या आयपीएल २०२४ मध्येही यावर चर्चा रंगली, धोनीने आयपीएल २०२३ नंतर चाहत्यांसाठी आणखी एक सीझन खेळणार असल्याचे सांगितले, त्यानुसार २०२४ च्या आयपीएल सीझनमध्ये धोनीने दमदार फलंदाजी करत सर्वांचा चकित केले, पण आता ४२ वर्षीय धोनीचा खेळाडू म्हणून आयपीएलचा हा शेवटचा सीझन असू शकतो, असे बोलले जात होते. यावर धोनीचा जवळचा मित्र माजी फलंदाज सुरेश रैनाने मात्र एक वेगळ मत मांडल आहे. त्याने एकाच शब्दात उत्तर देत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

आयपीएलचा सीझन सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली, यानंतर धोनीच्या निवृत्तीचा प्रश्न आणखी जोर धरु लागला, त्याचवेळी सुरेश रैनाने जिओ सिनेमावरील चर्चेदरम्यान धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार की नाही याचे उत्तर अगदी एका शब्दात दिलेय.

आयपीएलच्या कमेंट्री पॅनलमध्ये रैना आणि आरपी सिंह सहभागी झाला होता. यावेळी आरपी सिंहला विचारण्यात आले की, पार्थिव म्हणाला की, हा धोनीचा शेवटचा सीझन असू शकतो. तुम्हाला काय म्हणायचे आहे? यावर भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाने उत्तर दिले की, हा शेवटचा सीझन आहे असे वाटत नाही.

VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…

आरपी सिंहच्या उत्तरातही स्पष्टता नव्हती कारण त्यामागचे कारणही तसेच सांगितले जात आहे. नुकत्याच मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर धोनी लंगड चालताना दिसला, यावेळी रैनाने त्याला मदत केली.

यावेळी आरपीने त्याला विचारलेलाच प्रश्न रैनाकडे वळवला आणि विचारले की, रैना तुला काय वाटते हा धोनाचा शेवटचा सीझन असेल? यावर रैनाने एकाच शब्दात उत्तर दिले, ते म्हणजे. “खेळणार….” रैनाच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावरही धोनीच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळी लिहिल्यात, अभी ना जाओ छोडकर ये दिल अभी भरा नही, यावर दुसऱ्य युजरने लिहिले की, धोनी अजूनही तंदुरुस्त दिसतोय, अनेक चाहत्यांनी पुढे लिहिले की, पुढच्या हंगामातही धोनीन चाहत्यांसाठी मैदानात यावे.