IPL 2025 LSG vs RCB Highlights: आयपीएल २०२५ च्या लीग स्टेजमधील अखेरचा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने लखनौचा पराभव करत २२७ धावांचे मोठे लक्ष्य पहिल्यांदाच गाठले आहे. यासह आरसीबीने गुणतालिकेत टॉप-२ मध्ये स्थान मिळवले आहे. यासह संघ आता पंजाब किंग्सविरूद्ध क्वालिफायर-१ खेळणार आहे.
IPL 2025 Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Highlights: आयपीएल २०२५ लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचे हायलाईट्स
LSG vs RCB: आरसीबीचा लखनौवर विजय
LSG vs RCB: जितेश शर्माचं वादळी अर्धशतक
१७व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जितेश शर्माला दिग्वेश राठीने झेलबाद केलं. पण बॅकफूट नो बॉलमुळे जितेश नाबाद राहिला आणि त्याने फ्रीहिटवर षटकार खेचत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
LSG vs RCB: जितेश शर्मा-मयंक अग्रवालची अर्धशतकी भागीदारी
विराट कोहलीच्या विकेटनंतर जितेश शर्मा आणि मयंक अग्रवालच्या जोडीने संघाचा डाव सावरला आहे. या दोघांनी २२ चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली आहे. जितेश ३९ तर मयंक ३६ धावा करत खेळत आहेत. यासह आऱसीबीला विजयासाठी ३० चेंडूत ५१ धावांची गरज आहे.
LSG vs RCB: विराट कोहली झेलबाद
१२ व्या षटकात आवेश खानने दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीला झेलबाद केलं. विराट कोहली मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ झेलबाद झाला. विराटने ३० चेंडूत १० चौकारांसह ५४ धावा केल्या. यासह आरसीबीने १२ षटकांत ४ बाद १३२ धावा केल्या आहेत. यासह आरसीबीला विजयासाठी ४८ चेंडूत ९६ धावांची गरज आहे.
विराट कोहलीने २७ चेंडूत १० चौकारांसह ५२ धावा करत यंदाचं आपलं ८वं अर्धशतक पूर्ण केलं आहे. एका टोकाकडून विकेट गेल्यानंतर विराटने संघाचा डाव सावरला आहे. १०व्या षटकात मयंक अग्रवालने चौकारांची हॅटट्रिक लगावत सलग २ विकेट्सचा दबाव कमी केला. यासह आऱसीबीने १० षटकांत ३ बाद ११५ धावा केल्या.
LSG vs RCB: दोन चेंडूत २ धक्के
आरसीबीला विल्यम ओरूकने आठव्या षटकात दोन मोठे धक्क दिले आहेत. षटकातील पाचव्या चेंडूवर रजत पाटीदार झेलबाद झाला. तर अखेरच्या चेंडूवर नुकताच आलेला लियाम लिव्हिंगस्टोन गोल्डन डकवर पायचीत होत बाद झाला. यासह आरसीबीने ८ षटकांत ३ बाद ९० धावा केल्या आहेत.
LSG vs RCB: पॉवरप्ले
चांगल्या सुरूवातीनंतर पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात फिल सॉल्ट आकाशच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यासह लखनौला पहिली विकेट मिळाली. तर आरसीबीने ६ षटकांत १ बाद ६६ धावा केल्या आहेत.
LSG vs RCB: विराट-सॉल्टची चांगली सुरूवात
विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी पॉवरप्लेमध्ये चांगली सुरूवात करत आरसीबीला चांगली सुरूवात करून दिली आहे. ५ षटकांत दोघांनी मिळून ६० धावा केल्या.
LSG vs RCB: चौकारासह सुरूवात
आरसीबीचे सलामीवीर फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने पहिल्याच षटकात चौकारांसह सुरूवात करत ९ धावा केल्या आहेत.
LSG vs RCB: ऋषभ पंतचं शतक अन् धावांचा डोंगर
ऋषभ पंतने अखेरच्या सामन्यात ६१ चेंडूत ११८ धावांची धुव्वाधार खेळी करत धावांचा दुष्काळ संपवला. पंतने वादळी खेळी करत लखनौला धावांचा डोंगर उभारून दिला. याशिवाय पंतने मार्शबरोबर १५२ धावांची भागीदारी रचत आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. लखनौने यासह २० षटकांत ३ विकेट्स गमावत २२७ धावा केल्या आहेत. आऱसीबीला या महत्त्वाच्या सामन्यात विजयासाठी लखनौने २२८ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे.
LSG vs RCB: आरसीबीने अखेरीस मिळवली दुसरी विकेट
ऋषभ पंत आणि मिचेल मार्शच्या जोडीने ७८ चेंडूत १५२ धावांची भागीदारी करत आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण अखेरीस भुवनेश्वर कुमारने १६व्या षटकात मार्शला झेलबाद करवत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. यासह १६व्या षटकात लखनौने २ बाद १७७ धावा केल्या आहेत.
LSG vs RCB: मिचेल मार्शचं अर्धशतक
ऋषभ पंतनंतर आता संथ सुरूवात केलेल्या मिचेल मार्शने अखेरीस ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा करत अर्धशतक झळकावलं. यासह त्याने यंदाच्या मोसमातील आपल्या ६०० अधिक धावांचा टप्पा गाठला आहे.
LSG vs RCB: पंत-मार्शची शतकी भागीदारी
ऋषभ पंत आज चांगल्या फॉर्मात असून मार्शसह त्याने शतकी भागीदारी करत आरसीबीसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या दोघांनी ५७ चेंडूत १०२ धावांची भागीदारी केली आहे. पंत ५८ धावा तर मार्श ४५ धावा करत खेळत आहे. यासह लखनौने १२ षटकांत १ बाद १२७ धावा केल्या आहेत.
LSG vs RCB: ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक
ऋषभ पंतने आरसीबीविरूद्धच्या लीग टप्प्यातील अखेरच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत आपला फॉर्म दाखवून दिला. ऋषभ पंतने या सामन्यात २९ चेंडूत ५ चौकार ३ षटकारांसह ५२ धावा करत वादळी अर्धशतक झळकावलं. यासह १० षटकांत लखनौने १ बाद १०० धावा केल्या आहेत.
LSG vs RCB: पॉवरप्ले
लखनौने पॉवरप्लेमध्ये १ बाद ५५ धावा केल्या आहेत. मिचेल मार्शची बॅट शांत असून तो फक्त १५ धावांवर खेळत आहे. तर ऋषभ पंतने चांगली सुरूवात करत १०० धावा करत खेळत आहे.
LSG vs RCB: पंतने कुटल्या १८ धावा
आरसीबीविरूद्ध पहिली विकेट गेल्यानंतर ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने येताच यश दयालच्या चौथ्या षटकात वादळी फटकेबाजी केली. पंतने २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा कुटल्या आणि संघाला ४४ धावांचा टप्पा गाठून दिला.
LSG vs RCB: पहिली विकेट
आरसीबीने तिसऱ्या षटकात पहिली विकेट मिळवली आहे. नुवान तुषाराने लखनौचा नवा सलामीवीर मॅथ्यू ब्रिट्जकेला क्लीन बोल्ड करत ब्रेकथ्रू मिळवून दिला. यासह लखनौने ३ षटकांत १ बाद २६ धावा केल्या आहेत.
LSG vs RCB: सामन्याला सुरूवात
लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. लखनौकडून नवा खेळाडू सलामीला उतरला आहे, मॅथ्यू ब्रिटझके आणि मिचेल मार्शची जोडी उतरली आहे. पहिल्या षटकात २ चौकारांसह लखनौने बिनबाद ११ धावा केल्या आहेत.
LSG vs RCB: आरसीबीची प्लेईंग इलेव्हन
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकिपर), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा
LSG vs RCB: लखनौ सुपर जायंट्सची प्लेईंग इलेव्हन
मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, विल्यम ओरुक
लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याची नाणेफेक बंगळुरू संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीच्या आजच्या सामन्यातही जितेश शर्मा संघाचे नेतृत्त्व करणार आहे. रजत पाटीदार दुखापतीमुळे फलंदाजीला येईल. तर दोन्ही संघातील बरेचसे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी गेले आहेत.
LSG vs RCB: आयपीएल २०२५ मधील अखेरचा सामना
आयपीएल २०२५ च्या लीग टप्प्यातील आज अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लखनौच्या घरच्या मैदानावर होणार आहे. दोन्ही संघांचा हा अखेरचा सामना असून आरसीबीला या सामन्यात विजय अनिवार्य आहे.