IPL 2025 PBKS vs LSG Highlights: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ५४ वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना प्रभसिमरन सिंगने ९४ धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या बळावर पंजाबने २० षटकांअखेर ५ गडी बाद २३६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला ७ गडी बाद १९९ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबने हा सामना ३७ धावांनी आपल्या नावावर केला.
IPL 2025 Punjab Kings vs Lucknow Super Giants Highlights: आयपीएल २०२५ पंजाब किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स हायलाईट्स
PBKS vs LSG Live: पंजाबचा दमदार विजय
आयपीएल २०२५ स्पर्धेतील ५४ वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना प्रभसिमरन सिंगने ९४ धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या बळावर पंजाबने २० षटकांअखेर ५ गडी बाद २३६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला ७ गडी बाद १९९ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबने हा सामना ३७ धावांनी आपल्या नावावर केला.
PBKS vs LSG Live: लखनऊचे ६ फलंदाज तंबूत! अर्धशतकाच्या जवळ असताना अब्दुल समद बाद
लखनऊ सुपर जायंट्सला सहावा धक्का बसला आहे. अब्दुल समद ४५ धावांवर माघारी परतला आहे.
PBKS vs LSG Live: बॅट सुटली, पण कॅच पकडली; रिषभ पंत स्वस्तात माघारी परतला
या सामन्यात रिषभ पंतला चांगली सुरूवात मिळाली होती. पण या सुरूवातीचा फायदा त्याला घेता आलेला नाही. तो या सामन्यातही स्वस्तात माघारी परतला आहे.
PBKS vs LSG Live: विस्फोटक पूरनच्या खेळीला पूर्णविराम! पंजाब मजबूत स्थितीत
पावरप्लेच्या षटकांमध्ये अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. अर्शदीप सिंगने विस्फोटक फलंदाज निकोलस पूरनला बाद करत माघारी धाडलं आहे.
PBKS vs LSG Live: लखनऊची फ्लॉप सुरूवात! एकाच षटकात सलामी जोडी परतली तंबूत
लखनऊला धावांचा पाठलाग करताना हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. मिचेल मार्शनंतर एडन मार्करमही स्वस्तात माघारी परतला आहे.
PBKS vs LSG Live: लखनऊची फ्लॉप सुरूवात! तिसऱ्याच षटकात स्टार फलंदाज तंबूत
लखनऊला तिसऱ्या षटकात मोठा धक्का बसला आहे. मिचेल मार्श शून्यावर माघारी परतला आहे.
PBKS vs LSG Live: प्रभसिमरन सिंगकडून लखनऊच्या गोलंदाजांची धुलाई! पंजाबने उभारला २३६ धावांचा डोंगर
या सामन्यात पंजाबचा सलामीवीर प्रभसिमनर सिंगने लखनऊच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यासह पंजाबने २० षटकांअखेर २३६ धावांचा डोंगर उभारला आहे. लखनऊला हा सामना जिंकण्यासाठी २३७ धावांची गरज आहे.
PBKS vs LSG Live: प्रभसिमरनसिंगचं शतक थोडक्यात हुकलं! पंजाब मजबूत स्थितीत
प्रभसिमरनसिंगला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र, त्याचं शतक थोडक्यात हुकलं. तो ९१ धावांवर बाद होऊन माघारी परतला.
PBKS vs LSG Live: प्रभसिमरनसिंग गरजला! पंजाबच्या २०० धावा पूर्ण
प्रभसिमरनसिंगच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर पंजाबने २०० धावांचा पल्ला गाठला आहे.
PBKS vs LSG Live: नेहाल वढेराच्या खेळीला पूर्णविराम
नेहाल वढेराने मधल्या षटकांमध्ये दमदार फलंदाजी केली, पण तो १६ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
PBKS vs LSG Live: पंजाबला तिसरा मोठा धक्का! अर्धशतकाच्या जवळ असताना श्रेयस अय्यर बाद
पंजाबला तिसरा मोठा धक्का बसला आहे. अर्धशतकाच्या जवळ असताना श्रेयस अय्यर बाद होऊन माघारी परतला आहे. श्रेयस ४५ धावांवर माघारी परतला आहे.
PBKS vs LSG Live: पंजाबच्या १०० धावा पूर्ण! अय्यर- प्रभसिमरनची जोडी जमली
पंजाबने या डावात दमदार सुरूवात केली. मात्र, सुरूवातीलाच २ मोठे धक्के बसले. आता श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरनची जोडी जमली असून पंजाबने १०० धावा पूर्ण केल्या आहेत.
PBKS vs LSG Live: पंजाबला दुसरा मोठा धक्का, जोस इंग्लिस झेलबाद
पंजाबला दुसरा मोठा धक्का बसला आहे. जोस इंग्लिस बाद होऊन माघारी परतला आहे.
PBKS vs LSG Live: जोश इंग्लिसची वादळी सुरूवात
पहिली विकेट गेल्यानंतर श्रेयस अय्यरऐवजी तिसऱ्या क्रमांकावर जोश इंग्लिस फलंदाजीला आला आणि येताच त्याने चौकाराने सुरूवात केली. तर मयांक यादवच्या दुसऱ्या षटकात त्याने षटकारांची हॅटट्रिक लगावली.
PBKS vs LSG Live: आकाश सिंग
लखनौ सुपर जायंट्सकडून आजच्या सामन्यात आकाश सिंगला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. त्याने पहिल्याच षटकात प्रियांश आर्यला झेलबाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.
PBKS vs LSG Live: लखनौची प्लेईंग इलेव्हन
एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकिपर/कर्णधार), अब्दुल समद, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, आकाश महाराज सिंग, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, मयंक यादव, प्रिन्स यादव
PBKS vs LSG Live: पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकिपर), शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, अजमातुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग</p>
पंजाब किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स सामन्याची नाणेफेक लखनौने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मार्कस स्टॉयनिस परतला आहे.
PBKS vs LSG Live: लखनौचा संपूर्ण संघ
ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, एडन मारक्रम, मिचेल मार्श, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंग, एम सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, शाहबाज अहमद, आकाश सिंग, शमर जोसेफ (आरटीएम) , प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगेरकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रिट्झके
शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे.