IPL 2025 Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders Highlights: आयपीएल २०२५ एका आठवड्याच्या स्थगितीनंतर आजपासून पुन्हा सुरूवात झाली. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे अचानक आयपीएल स्थगित केली गेली. यानंतर आज म्हणजेच १७ मे पासून पुन्हा आयपीएलचे उर्वरित सामने सुरू झाले. पण पहिलाच सामना आरसीबी वि. केकेआर पावसामुळे रद्द करण्यात आला. यासह दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. तर केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
IPL 2025 RCB vs KKR Highlights: आयपीएल २०२५ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे हायलाईट्स
आयपीएल २०२५ च्या स्थगितीनंतर पहिला सामना आरसीबी वि. केकेआरमध्ये खेळवला जाणार होता. हा बंगळुरूमधील सामना नाणेफेकीशिवाय पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. यासह दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला आहे. पण हा सामना रद्द झाल्याने कोलकाता नाईट रायडर्स संघ अधिकृतपणे आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. तर आरसीबीचा संघ सर्वाधिक १७ गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. पहिल्या स्थानी पोहोचला असला तरी संघ प्लेऑफसाठी अधिकृतपणे पात्र ठरलेला नाही.
RCB vs KKR Live: ५ षटकांचा सामना
१०.१५ होऊन गेले असले तरी बंगळुरूमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली नाही. ब्रोडकास्टर्सच्या मते पाच षटकांचा सामना होण्यासाठी १०.५६ ही कट ऑफ वेळ आहे. तर पाच षटकांचा सामना होण्यासाठी १०.४० ला नाणेफेक होणं गरजेचं आहे.
बंगळुरूमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली नाही. पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे आता चाहतेही स्टेडियमबाहेर जाताना दिसत आहेत. त्यामुळे सामना होणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा आहेत.
10:15pm Rain has not subsided. But broadcast says that for any length of match to happen, toss needs to happen by 10:40pm. Remember, the cut-off time for starting a five-over game is 10:56pm.
बंगळुरूमध्ये अजूनही पाऊस कायम आहे. आरसीबी-केकेआरचे खेळाडू पाऊस कधी विश्रांती घेणार या प्रतिक्षेत आहेत. तर कोहलीसाठी पांढरी कसोटी जर्सी घालून आलेले चाहते सामना सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
RCB vs KKR Live: पावसाची जोरदार बॅटिंग
बंगळुरूमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मैदानावर पावसाची सर सातत्याने कायम आहे. त्यामुळे सामाना सुरू होण्यासाठी पुन्हा व्यत्यय येत आहे. सामन्याची नाणेफेकही अद्याप झालेली नाही. ५ षटकांचा सामना सुरू होण्याची कट ऑफ वेळ १०.५६ आहे. तर ८.३० नंतर षटकं कमी होण्यास सुरूवात झाली आहे.
RCB vs KKR Live: पावसाने घेतली विश्रांती
बंगळुरूमध्ये पावसाचा जोर ओसरला असून मैदान सुकवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंचदेखील चर्चा करताना दिसत आहेत. पण पिचवरील कव्हर्स अजून हटवण्यात आलेले नाहीत.
RCB vs KKR Live: 5 षटकांचा सामना होण्याची कट ऑफ वेळ
आऱसीबी वि. केकेआर सामना कधी सुरू होणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. बंगळुरमध्ये होत असलेल्या या सामन्यात पावसाची बॅटिंग सुरू आहे. याशिवाय अद्याप सामना कधी सुरू होणार याची अपडेट आलेली नाही. त्यामुळे ५ षटकांचा सामना सुरू होण्याची कट ऑफ वेळ १०.५६ आहे. तोपर्यंत जर सामना सुरू झाला नाही तर सामना रद्द होण्याची भिती आहे. ज्याचा आरसीबीला फटका बसू शकतो.
RCB vs KKR Live: विराट कोहलीला चाहत्यांचा Tribute
विराट कोहलीचे चाहते त्याच्या कसोटी निवृत्तीनंतर त्याला ट्रिब्यूट देण्यासाठी पांढरी जर्सी घालून पोहोचले आहेत. चाहते पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत आणि मोठ्या संख्येने चाहते पोहोचले आहेत.
RCB vs KKR Live: ओव्हर्स कमी व्हायला कधी सुरूवात होणार?
आरसीबी वि. केकेआर सामन्याला पावसामुळे उशिरा सुरूवात होत आहे. पावसाचा जोर कायम असून सामना कधी सुरू होणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. बंगळुरूमधील ड्रेनेज सिस्टीम चांगली असल्याने सामना लवकर सुरू होऊ शकतो. पण पाऊस थांबणं गरजेचं आहे. षटकं कमी व्हायला सुरूवात ८.४५ नंतर होणार आहे. तोपर्यंत सामना पूर्ण होण्याची शक्यता कायम आहे.
RCB vs KKR Live: पावसाचा जोर कायम
बंगळुरूमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. आरसीबी वि. केकेआर सामन्यावर या पावसाचा परिणाम होताना दिसण्याची चिन्ह आहेत. आज आयपीएलला पुन्हा सुरूवात होत होती. पण पावसामुळे या आनंदावर विरझण आलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याची नाणेफेक उशिरा होणार आहे. बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता सामन्यापूर्वी वर्तवण्यात आली होती. पण आता सामना सुरू होण्याआधीच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
RCB vs KKR Live: मुसळधार पावसाची शक्यता
आरसीबी वि. केकेआर सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पण सामन्यादरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला फटका बसणार, जाणून घ्या.
IPL 2025: RCB vs KKR सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होणार? बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
RCB vs KKR Live: आयपीएलला स्थगितीनंतर धक्का
आयपीएल २०२५ ला स्थगितीनंतर धक्का बसला आहे. अनेक संघातील काही विदेशी खेळाडू उर्वरित सामने आणि प्लेऑफचे सामने खेळताना दिसणार नाहीयेत. आजचा सामना आरसीबी वि. केकेआरमध्ये होणार आहे. यामध्ये जोश हेझलवूड दुखापतीमुळे खेळताना दिसणार नाही. याशिवाय काही संघांनी तात्पुरत्या बदली खेळाडूंचीही घोषणा केली आहे.
भारत-पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावामुळे आयपीएल २०२५ ला एका आठवड्याकरता स्थगित केलं होतं. या स्थगितीनंतर आता स्पर्धा पुन्हा १७ मे पासून सुरू झाली आहे. तर अंतिम सामना ३ जूनला खेळवला जाणार आहे. आयपीएलमधील उर्वरित सामने मोजक्याच संघांच्या घरच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत.