IPL 2025 Rajasthan Royals vs Punjab Kings Highlights: आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. हा सामना जिंकून पंजाबने प्लेऑफच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकलं आहे.
RR vs PBKS Highlights: पंजाबचा रॉयल्सवर शानदार विजय
या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सवर १० धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह पंजाबने प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकलं आहे.
RR vs PBKS Live: शिमरॉन हेटमायर झेलबाद
१८व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर अझमतुल्ला ओमरझाईने हेटमायरला झेलबाद करवत राजस्थानला धक्का दिला. तर आता राजस्थानला १२ चेंडूत विजयासाठी ३० धावांची गरज आहे.
RR vs PBKS Live: रियान पराग क्लीन बोल्ड
१४व्या षटकात हरप्रीत ब्रार गोलंदाजीला आला आणि त्याने दुसऱ्या चेंडूवर रियान परागला क्लीन बोल्ड करत राजस्थानला मोठा धक्का दिला.
RR vs PBKS Live: संजू सॅमसन झेलबाद
११ व्या अझमतुल्ला ओमरझाईने दुसऱ्याच चेंडूवर संजू सॅमसनला झेलबाद केलं. मार्काे यान्सन मागे धावत जाऊन त्याने एक अप्रतिम झेल टिपला. यासह पंजाब किंग्सने सामन्यात पुनरागमन केलं आहे. यासह ११ षटकांत राजस्थानने ३ बाद ११९ धावा केल्या आहेत.
RR vs PBKS Live: यशस्वी जैस्वालचे अर्धशतक
यशस्वी जैस्वालने वादळी फटकेबाजीसह २४ चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. पण जैस्वाल अर्धशतकानंतर झेलबाद झाला आहे. हरप्रीतच्या गोलंदाजीवर झेलबाद होण्यापूर्वी जैस्वालने २४ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. यासह राजस्थानने ९ षटकांत २ बाद ११० धावा केल्या आहेत.
RR vs PBKS Live: पाचव्या षटकात राजस्थानला धक्का
राजस्थान रॉयल्सला वादळी सुरूवातीनंतर पाचव्या षटकात पहिला धक्का बसला आहे. पाचव्या षटकात हरप्रीत ब्रार गोलंदाजीसाठी आला आणि त्याने पंजाबला ब्रेकथ्रू मिळवून दिला. वैभव सूर्यवंशी १५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४० धावा करत झेलबाद झाला. यासह राजस्थानने ५ षटकांत १ बाद ७६ धावा केल्या आहेत.
RR vs PBKS Live: ३ षटकांत ५० धावा
पहिल्या षटकात २२ धावा, दुसऱ्या षटकात १७ धावा आणि तिसऱ्या षटकात १२ धावा कुटत राजस्थानने ३ षटकांत ५० धावा केल्या आहेत. जैस्वालने वादळी फॉर्मात असून त्याने तिसऱ्या षटकात ३ चौकार लगावत संघाला ५१ धावांवर नेलं आहे.
RR vs PBKS Live: वैभवने कुटल्या १७ धावा
यशस्वी जैस्वालनंतर वैभव सूर्यवंशीने मार्काे यान्सनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली. २ षटकार आणि एका चौकारासह १७ धावा कुटल्या आणि २ षटकांत ३९ धावा राजस्थानने केल्या आहेत.
पंजाबने दिलेल्या २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने वादळी सुरूवात केली. यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात ४ चौकार आणि एक षटकारासह फटकेबाजी करत २२ धावा कुटल्या. अर्शदीप सिंगच्या उत्कृष्ट गोलंदाजीवरही यशस्वीने चांगले फटके लगावले.
RR vs PBKS Live: पंजाबची चांगली फलंदाजी
पंजाब किंग्सचे फलंदाज नेहाल वढेरानंतर शशांक सिंग आणि अझमतुल्ला ओमरझाई यांनी वादळी फटकेबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. १९ षटकांतच संघाने २०० धावांचा पल्ला गाठला होता. तर अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शशांकने षटकार लगावत चांगली सुरूवात केली. यानंतर चौकार आणि धावा घेत संघाला २१९ धावांपर्यंत नेले. यासह राजस्थानला विजयासाठी २२० धावांचे आव्हान दिले.
RR vs PBKS Live: शशांक सिंगचं अर्धशतक
पंजाब किंग्सचा फिनिशर शशांक सिंगने शानदार फटकेबाजी करत २७ चेंडूत अर्धशतक झळकावत संघाची धावसंख्या २०० पार नेण्यात मोठी भूमिका बजावली.
RR vs PBKS Live: नेहाल वढेरा झेलबाद
आकाश मधवालने १६व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर नेहाल वढेराला हेटमायरकडून झेलबाद केलं. नेहाल वढेराने ३७ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७० धावा केल्या.
RR vs PBKS Live: नेहाल वढेरा अर्धशतक
नेहाल वढेराने पंजाब किंग्सचा डाव सावरत अर्धशतकी खेळी केली. नेहाल वढेराने २५ चेंडूत ५३ धावा करत शानदार अर्धशतक झळकावले. तर पुढच्याच चेंडूवर षटकार लगावत त्याने अर्धशतकाचं सेलिब्रेशन केलं. यासह पंजाबने १३ षटकांत ४ बाद १३४ धावा केल्या आहेत.
RR vs PBKS Live: श्रेयस अय्यर झेलबाद
११ वे षटक टाकण्यासाठी रियान परागला गोलंदाजी सोपवली. त्याने ११ व्या षटकात श्रेयसला झेलबाद करवत राजस्थानला चौथी विकेट मिळवून दिली. श्रेयस २५ चेंडूत ३० धावा करत झेलबाद झाला.
RR vs PBKS Live: ६७ धावांची भागीदारी
श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेराने चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. दोघांनी ६७ धावांची भागीदारी रचत संघाला १०० धावांच्या जवळ आणलं आहे. यासह पंजाबने १० षटकांत ३ विकेट्स गमावत ९७ धावा केल्या.
RR vs PBKS Live: पॉवरप्ले
पॉवरप्लेमध्ये राजस्थानने पंजाबला ३ विकेट्स घेत धक्के दिले. प्रियांश आर्य, मिचेल ओवेन, प्रभसिमरन सिंग झेलबाद झाले. यासह श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेरा सध्या क्रीझवर असून पंजाबने ६ षटकांत ३ बाद ५८ धावा केल्या आहेत. संघाचे ३ विकेट्स गेले असले तरी त्यांच्या धावगतीला ब्रेक लागलेला नाही.
चौथ्या षटकात तुषार देशपांडेने प्रभसिमरन सिंगला झेलबाद करत पंजाबला तिसरा धक्का दिला. यासह पंजाबने ४ षटकांत ३ बाद ४३ धावा केल्या आहेत.
RR vs PBKS Live: दुसरी विकेट
क्वेना मफाका तिसरे षटक टाकण्यासाठी आला. प्रभसिमरनने पहिल्याच दोन चेंडूवर दोन चौकार लगावत चांगली सुरूवात केली. तर बिग बॅश लीगचा हिरो असलेला मिचेल ओवेनला पंजाबने पदार्पणाची संधी दिली. पण तो खातेही न उघडता झेलबाद झाला.
RR vs PBKS Live: दुसऱ्या षटकात विकेट
दुसऱ्या षटकात तुषार देशपांडेला गोलंदाजीसाठी बोलावलं. तुषारने पाचव्या चेंडूवर प्रियांश आर्यला झेलबाद करत पहिली विकेट मिळवून दिली.
RR vs PBKS Live: चौकारांसह सुरूवात
फजलहक फारूकीच्या पहिल्याच षटकात प्रियांश आर्यने पहिल्या चेंडूवर चौकार लगावत सुरूवात केली. तर प्रभसिमरन सिंगनेही सामन्यातील पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. यासह पहिल्या ११ धावा पंजाबने केल्या.
RR vs PBKS Live: भारतीय सैन्याचे मानले आभार
पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यात भारतीय सैन्याचे आभार मानण्यात आले. ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीत भारतीय सैन्याने दिलेल्या त्यांच्या योगदानासाठी ३.२५ वाजता राष्ट्रगीत म्हणत जवानांना सलाम केला.
RR vs PBKS Live: राजस्थान रॉयल्सची प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकिपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, वानिंदू हसरंगा, क्वेना मफाका, तुषार देशपांडे, आकाश मधवाल, फजलहक फारुकी
RR vs PBKS Live: पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन
पंजाब किंग्सकडून मिचेल ओवेन हा ऑस्ट्रेलियन खेळाडू पदार्पण करत आहे. तर आफ्रिकेचा मार्काे यान्सन संघात परतला आहे.
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, नेहल वढेरा, मिशेल ओवेन, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को यानसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
RR vs PBKS Live: नाणेफेक
राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स सामन्याची नाणेफेक पंजाबने जिंकली असून संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राजस्थानचा संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. राजस्थान संघाचा नियमित फलंदाज संजू सॅमसन फिट होऊन संघात परतला आहे.
RR vs PBKS: पंजाबसाठी अतिशय महत्वाचा सामना
हा सामना पंजापब किंग्ज संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शर्यतीत आहे. त्यामुळे हा सामना जिंकून पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.