Sam Curran vs Shimron Hetmyer: पंजाब आणि राजस्थान यांच्यातील धरमशाला येथे झालेल्या सामन्याने टी२० सामन्यात जे घडले पाहिजे ते सर्व दाखवून दिले. धावांनी भरलेला हा सामन्यात दोन्हीकडून स्लीजिंग पाहायला मिळाले. वेगवान फलंदाजी, याशिवाय मैदानावर संघांच्या खेळाडूंमधील जोरदार वादावादी अशा दोन्ही गोष्टी झाल्या. पंजाबचा सॅम करण आणि राजस्थानचा शिमरॉन हेटमायर यांच्यात काही शाब्दिक चकमक झाली यावरून सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ते त्यादिवशी वेगळ्याच मूडमध्ये दिसत होते.

राजस्थान रॉयल्सने शुक्रवारच्या महत्त्वपूर्ण सामन्यात पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव करून आयपीएल २०२३च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या अंधुक आशा जिवंत ठेवल्या. दोन चेंडू बाकी असताना या विजयासह, राजस्थानने साखळी टप्प्यातील सर्व १४ सामन्यांतून १४ गुण मिळवून पाचवे स्थान मिळवले. रॉयल्सला आता लीगमधील उर्वरित सामन्यांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. राजस्थानसाठी सलामीवीर यशस्वी जैस्वालने ३६ चेंडूंत ८ चौकारांसह ५० धावांची खेळी खेळली आणि देवदत्त पडिक्कल (५१ धावा, ३० चेंडू, ५ चौकार, ३ षटकार) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ३९ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली. यानंतर कॅरेबियन बिग हिटर शिमरॉन हेटमायरने रॉयल्सला विजयापर्यंत पोहचवले आणि विजय मिळवून दिला.

Hardik Pandya No look shot video viral during India vs Bangladesh 1st T20 Match
Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या No Look शॉटने चाहत्यांना लावलं वेड, VIDEO होतोय तुफान व्हायरल
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
former cricketer Wasim Jaffer
रणजीपाठोपाठ इराणी जेतेपदाने मुंबईचे वर्चस्व अधोरेखित! १९९७च्या विजेत्या संघातील सदस्य वसिम जाफरचे मत
Sanjay Manjrekar comment created Controversy face the taunt of Mumbai lobby
‘उत्तरेकडील खेळाडूंकडे मी फारसे लक्ष…’, संजय मांजरेकर वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल; चाहते म्हणाले, ‘मुंबई लॉबी…’
India vs Bangladesh 1st T20I Match Updates in Marathi
IND vs BAN 1st T20 सामन्यापूर्वी ग्वाल्हेरमध्ये वाढवली सुरक्षा, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
Hindu Mahasabha
बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांनंतर हिंदू महासभा आक्रमक; ग्वाल्हेरमधील भारत-बांगलादेश सामन्याच्या दिवशी पाळणार ‘बंद’
stray dog ​​died man hit his on head with cricket bat in ​​Ghodbunde
ठाणे : भटक्या श्वानाचा मारहाणीत मृत्यू ,क्रिकेटच्या फळीने डोक्यात मारहाण
IND vs BAN Shubman Gill fifth Test century against Bangladesh
IND vs BAN : शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद, भारताने बांगलादेशला दिले ५१५ धावांचे लक्ष्य

हेटमायर आणि करन एकमेकांना भिडले

धावांचा पाठलाग करताना इंग्लिश अष्टपैलू खेळाडू सॅम करन आणि शिमरॉन हेटमायर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. १७व्या षटकातील ५व्या चेंडूवर हेटमायरविरुद्ध अपील झाले आणि अंपायरनी त्याला बाद घोषित केले. सॅम करनने बॅट्समनकडे जाऊन काहीतरी सांगून सेलिब्रेशन केले. पण हेटमायरने डीआरएस घेतला आणि तिसऱ्या अंपायरचा निर्णय त्याच्या बाजूने आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला, ओव्हर संपल्यानंतरही करन आणि हेटमायरमध्ये वाद सुरूच होता. तो इतका होता की त्यातील काही संभाषणासंदर्भात हेटमायरने बोलण्यास नकार दिला आहे.

१९व्या षटकात आले आमनेसामने

सॅम करन राजस्थानच्या डावाचे १९ वे षटक टाकण्यासाठी आला. शिमरॉन हेटमायरने पहिल्याच चेंडूवर त्याला शानदार चौकार ठोकला. चौकाराच्या पोजिशनमध्येच तो बॅट हातात घेऊन नॉन-स्ट्राइकर एंडला धावत गेला. मात्र, यावेळी करनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या षटकात हेटमायरने आणखी एक चौकार मारला पण करनला त्याची विकेट ५व्या चेंडूवर मिळाली. त्यानंतर दोघे पुन्हा आमनेसामने आले आणि त्यांच्यात आणखी शाब्दिक चकमक झाली. यामुळे आता आयपीएल २०२३ नियम न पाळल्यामुळे अधिक चर्चेत आहे आहे.

हेही वाचा: IPL 2023: धोनीचा फिटनेस कसा आहे, तो शेवटची आयपीएल खेळतोय का? चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकाने दिले भन्नाट उत्तर म्हणाला, “त्याचा गुडघा…”

त्या दोघांत काय नेमकं काय बोलणं झालं?

सामना संपल्यानंतर शिमरॉन हेटमायर मुलाखतीसाठी आला. जेव्हा हेटमायरला विचारण्यात आले की करनने तुला कोणते शब्द वापरले होते? नेमकं काय झालं? त्यावर त्याने हसून प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “मी इथे आमच्यातील बोलणे काहीही सांगू शकत नाही.” तो पुढे म्हणाला, “जेव्हा कोणी मला काहीतरी बोलते तेव्हा ते नेहमीच चांगले असते असे नाही, आज फारसे काही चांगले झाले नाही. आज मला फलंदाजी करताना मजा आली, त्यामुळे मला थोडा अधिक आत्मविश्वास मिळाला.”