Kavya Maran’s reaction viral during KKR vs SRH Qualifier 1 : आयपीएल २०२४ मधील पहिला क्वालिफायर सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादला २४ मे रोजी दुसरा क्वालिफायर सामने खेळावा लागणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यातील पराभवानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनची एक रिएक्शन व्हायरल होत आहे. जी तिने थर्ड अंपायरचा निर्णय पाहून दिली होती.

काव्या मारननची रिएक्शन व्हायरल –

सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनने संपूर्ण सामन्यात संघाचे मनोबल वाढवले. पण तिची एक खास रिएक्शन चर्चेचा विषय ठरली. वास्तविक, भुवनेश्वर कुमार त्याच्या दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू टाकत होता. भुवनेश्वरने टाकलेल्या या चेंडूवर सुनील नरेनचा चौकार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तो फसला. ज्यामुळे चेंडू सुनील नरेनच्या पॅडवर लागला. त्यामुळे तो चेंडू त्याच्या पॅडवर लागाला ज्यामुळे भुवनेश्वरने कुमारने एलबीडब्ल्यूची अपील केली. कारण हा चेंडू लेग स्टंपच्या आत होता.

Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
RCB vs RR Rain Abandoned Match Who Will Play Qualifier 2
RCB vs RR एलिमिनेटर सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोणाला मिळणार क्वालिफायरची संधी? काय आहे IPL चा नियम?
Ravichandran Ashwin Calls Sanju Samson Selfish After RR Captain Selected For T20 World Cup
“तो स्वार्थीपणे खेळतोय..”, अश्विनने संजु सॅमसनची विश्वचषकाच्या संघात निवड होताच केलं मोठं विधान; म्हणाला,”त्याची गरज..”
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”

सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी भुवनेश्वर कुमारसह एलबीडब्ल्यू (लेग बिफोर विकेट) साठी अपील केले, पण अंपायरने सुनील नरेनला आऊट दिले नाही. त्यामुळे ऑरेंज आर्मीने भुवनेश्वरच्या सांगण्यावरुन डीआरएस घेतला, पण चेंडू लेग स्टंपच्या बाहेर असल्याचे थर्ड अंपायरने पाहिले. त्यामुळे त्याने मैदानावर उपस्थित पंचांचा निर्णय योग्य असल्याचे मानले. या दरम्यान, चेंडू बाहेर असल्याचे पाहून काव्या मारनही हैराण झाली. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.

हेही वाचा – KKR vs SRH Qualifier 1 : राहुल त्रिपाठी धावबादनंतर भावूक, पायऱ्यांवर बसून रडतानाचा VIDEO व्हायरल

केकेआरची एसआरएचवर ८ विकेट्सनी मात –

आयपीएल २०२४ च्या क्वालिफायर १ सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. ज्यामध्ये हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबाद संङ निर्धारित २० षटकेही खेळू शकला नाही आणि १९.३ षटकांत १५९ धावा करून सर्वबाद झाला. या दरम्यान हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावले. त्याच्यानंतर हेन्रिक क्लासेन आणि पॅट कमिन्स ३० धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरले. या डावात कोलकात्याच्या मिचेल स्टार्कने ३४ धावांत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्तीने २ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – ‘गौतम गंभीरची काम करण्याची शैली एखाद्या कठोर वडिलांसारखीच…’, मुख्य प्रशिक्षकपदाच्या चर्चेवर आकाश चोप्राचे मत

केकेआर अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला –

यानंतर १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने हे लक्ष्य केवळ १३.४ षटकांत सहज गाठले. श्रेयस अय्यरने २४ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. याशिवाय व्यंकटेश अय्यरनेही २८ चेंडूत नाबाद ५१ धावांचे योगदान दिले. कोलकाता नाईट रायडर्सने ३८ चेंडू शिल्लक असताना सामना ८ गडी राखून जिंकण्यात यश मिळविले आणि आयपीएल २०२४ चा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला.