scorecardresearch

केकेआरला मोठा धक्का! अजिंक्य रहाणे आयपीएलमधून बाहेर

अजिंक्य रहाणे बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये चार आठवडे राहणार असल्याची शक्यता वर्तविली जातेय.

AJINKYA RAHANE
अजिंक्य रहाणे (संग्रहित फोटो)

प्लेऑफर्यंत पोहोचण्यासाठी संघांची चुरस लागलेली असताना कोलकाता नाईट रायडर्सची चिंता वाढली आहे. या संघातील दिग्गज फलंदाज अजिंक्य राहणे दुखापतीमुळे बायोबबल सोडून आयपीएलमधून बाहेर पडला आहे. उर्वरित सामन्यात तो खेळणार नसून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सची शेवटची पोस्ट शेन वॉर्नवर, शेन वॉर्नची रॉड मार्शवर,२ महिन्यांत ३ दिग्गज क्रिकेटपटूंचे निधन

क्रिकट्रॅकर या क्रिकेटविषयी माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य रहाणेने दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. १४ मे रोजी हैदराबादविरोधातील सामन्यात फलंदाजीदरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली होती. दुखापत झालेली असतानाही त्याने फलंदाजी केली होती. त्याने या सामन्यात २४ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या होत्या. आता मात्र त्याच्या पायाला त्रास जाणवत असल्यामुळे त्याने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचा >>> Video : जोस बटलर-रियान परागची एकच चर्चा, दोघांनी टिपला अप्रतिम झेल, कृणाल पांड्याला केलं ‘असं’ बाद

अजिंक्य रहाणे बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये चार आठवडे राहणार असल्याची शक्यता वर्तविली जातेय. त्यामुळे १ जुलै ते १७ जुलै या काळात भारत आणि इंग्लड यांच्यात होणाऱ्या सामन्यांतही तो सामील होण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा >>> ठरलं! महिला टी-२० चॅलेंज २०२२ स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व ‘My11Circle’कडे; २३ मेपासून रंगणार थरार

दरम्यान, दोन वेळा जेतेपद पटकावलेला अजिंक्य रहाणेचा केकेआर संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. केकेआरची येत्या १८ मे रोजी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सशी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी येथे लढत होणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-05-2022 at 18:26 IST
ताज्या बातम्या