आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघासमोरच्या अडचणी काहीकेल्या कमी होत नाहीयेत. हॅरी गुर्नेच्या जागेवर संघाने करारबद्ध केलेल्या अमेरिकेच्या अली खाननेही दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. पाकिस्तानी वंशाचा अमेरिकेन अली खान हा आयपीएलमध्ये खेळणारा पहिला खेळाडू ठरला होता. अली खानल नेमकी कशा पद्धतीची दुखापत झाली आहे हे समजू शकलेलं नसलं तरीही त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : राजस्थानने सामना गमावला, कर्णधार स्मिथला १२ लाखांचा दंड

कोलकाता नाईट रायडर्स संघाची आतापर्यंत स्पर्धेतली कामगिरी ही संमिश्र स्वरुपाची राहिलेली आहे. ४ सामन्यात २ विजय आणि २ पराभव पदरी असलेला कोलकात्याचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आज KKR समोर चेन्नई सुपरकिंग्जचं आव्हान असणार आहे. कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत अली खान त्रिंबागो नाईट रायडर्स संघाकडून अली खान खेळत होता. हॅरी गुर्नेने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे अली खानला KKR ला संघात जागा देण्यात आली होती. परंतू दुखापतीमुळे अलीला स्पर्धा अर्ध्यावर सोडावी लागणार आहे.