Virendra Sehwag Statement On Sanju Samson And K L Rahul: आयपीएल २०२३ मधील २६ वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे. एकीकडे संजू सॅमसन नेतृत्व करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे के एल राहुल लखनऊ संघाचं कर्णधारपद सांभाळत आहे. हे दोन्ही खेळाडू असे आहेत, ज्यांच्या क्षमतेबाबत कोणत्याही प्रकारची शंका नाही. परंतु, टीम इंडियासाठी दोघांनी खूपच चमकदार कामगिरी केलेली नाहीय. राहुलचा टीम इंडियासाठीचा फॉर्म गेल्या काही महिन्यांपासून खराब झाला आहे. या दोघांबाबत प्रतिक्रिया देताना वीरेंद्र सेहवागने म्हटलंय, टीम इंडियासाठी संजू सॅमसनपेक्षा के एल राहुल चांगला आहे.

राहुल खूप वर्षांपासून भारतीय संघासाठी कोणत्या ना कोणत्या फॉर्मेटमध्ये खेळताना दिसत आहे. तर संजू सॅमसनला सतत संधी मिळत नाहीय. वनडे फॉर्मेटमध्ये संजूने चांगली कामगिरी केलीय. परंतु, टी-२० मध्ये त्याने अपेक्षित अशी कामगिरी केली नाहीय. वीरेंद्र सेहवागने म्हटलं की, राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. तसंच विदेशातही शतकी खेळी केली आहे. या ३१ वर्षीय फलंदाजाने निर्धारीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज तसंच मधल्या फळीतही फलंदाजी करण्याची क्षमता दाखवली आहे.

नक्की वाचा – सारा तेंडुलकरला अर्जुनच्या पहिल्या विकेटची पडली भुरळ, पुन्हा पुन्हा हायलाईट्स पाहण्यात झाली दंग, रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेहवागने पुढं म्हटलं, जर तुम्ही भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्याबाबत म्हणत असाल, तर मला असं वाटतं की, के एल राहुल संजू सॅमसनपेक्षा चांगला आहे. त्याने कसोटी क्रिकेट खेळलं आहे आणि अनेक देशात शतक ठोकलं आहे. त्याने वनडेत सलामीवीर फलंदाज आणि मध्यम क्रमवारीतील फलंदाज म्हणूनही अप्रतिम कामगिरी केली आहे. तसंच टी-२० क्रिकेटमध्येही धावा कुटल्या आहेत.