IPL 2023 Final Ahmedabad Weather Updates : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी होणारा आयपीएल २०२३ अंतिम सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाला आणि २९ मे रोजी म्हणजे आजच्या राखीव दिवशी हा अंतिम सामना होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हवामान विभागाकडून रविवारी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. स्टेडियममध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यामुळे प्रेक्षकांना आणि खेळाडूंना नाहक त्रास सहन करावा लागला.

इंडियन प्रीमियर लीगच्या नियमानुसार जर सामना कट ऑफच्या वेळी म्हणजेच १२ वाजून ६ मिनिटांनी सुरु झाला नाही, तर फायनलसाठी एक रिझर्व्ह डे असतो. या वेळत सामना सुरु झाल्यास दोन्ही संघांमध्ये पाच षटकांचा सामना खेळवला जातो. सोमवारी अहमदाबादमध्ये पाऊस कोसळ्याचा अंदाज वर्तवण्यात आला नाही. ज्यामुळे सामना पूर्ण २० षटकांचा होण्याची शक्यता आहे. एक्यूवेदरच्या माहितीनुसार, अहमदाबाद येथे आज होणाऱ्या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची तीन टक्केच शक्यता आहे. परंतु, दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नक्की वाचा – एम एस धोनीच्या भविष्याबाबत वीरेंद्र सेहवागने दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, “जर तो कर्णधार नसेल…”

हवामान शास्त्रज्ञ काय म्हणतात?

भारतीय हवामान विभाग सोमवारी २९ मे रोजी साधारण ढगाळ वातावरण राहणा असल्याचा दावा करत आहे. नवदीप दहिया यांच्या माहितीनुसार, आपण राखीव दिवसाचा उपयोग करत आहोत. आज पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. कारण काल पडलेल्या पावसामुळं वातावरण थंड झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल रविवारी नाणेफेक करण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच साडेसहा वाजता मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पुढेही सलग दोन तीन तास पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. त्यानंतर मैदानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खेळपट्टीवर कव्हर बसवावे लागले आणि वॉर्मअपसाठी मैदानात उतरलेल्या खेळाडूंना बाहेर जावं लागलं. आऊटफील्डच्या ज्या भागात कव्हर नव्हते, तिथे पाणी जमा झालं होतं.पाऊस थांबल्यानंतरही त्याला सुकवण्यात एक तासांहून अधिकचा कालावधी लागला असता.